श्रीराम नगरमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा भक्तिमय सोहळाअखंड हरिनाम सप्ताहासह भागवत कथा, कीर्तन, भजनाने परिसर दुमदुमला…!

0
8

श्रीराम नगरमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा भक्तिमय सोहळा
अखंड हरिनाम सप्ताहासह भागवत कथा, कीर्तन, भजनाने परिसर दुमदुमला…!

बारामती : श्रीराम नगर, भिगवण रोड, जळोची, बारामती येथील वै. भगवानराव बाबुराव तावरे यांनी स्थापन केलेल्या श्रीराम मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू झालेल्या या धार्मिक उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


उत्सवाच्या कालावधीत संगीत श्रीमद् भागवत कथा, भजन, कीर्तन, हरिपाठ, जागर, भारूड, काकडा, महापूजा, होमहवन तसेच अखंड हरिनाम सप्ताह यामुळे श्रीराम नगर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. ह.भ.प. बाळासाहेब महाराज पवार यांच्या अमोघ वाणीतून झालेल्या श्रीमद् भागवत कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ह.भ.प. कृष्ण महाराज मेहुणकर यांच्या सुश्राव्य कीर्तनातून श्रीकृष्ण जन्माचा सोहळा रंगला. यावेळी श्रीकृष्ण जन्माचा जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि भक्तिमय वातावरणाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. जन्मोत्सवानिमित्त पालखी सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी श्रीराम नगर तसेच बारामती पंचक्रोशीतील श्रीरामभक्त व श्रीकृष्णभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, ह.भ.प. संजय महाराज सायकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. सप्ताहाच्या काळात मंदिर परिसरात भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या संपूर्ण उत्सवाचे आयोजन ॲड. हरीश तावरे, श्री. पांडुरंग तावरे आणि चि. ऋषिकेश तावरे यांनी केले. तावरे परिवाराच्या वतीने दरवर्षी श्रीराम जन्मोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी हे दोन प्रमुख धार्मिक उत्सव भक्तिभावाने साजरे केले जातात.
सप्ताहाच्या काळात बारामती नगरपालिकेच्या वतीने मंदिर परिसरात स्वच्छता व्यवस्था चोख ठेवण्यात आली, त्यामुळे भाविकांना उत्सवाचा आनंद भक्तिमय आणि स्वच्छ वातावरणात घेता आला.

Previous articleदोन ड्रम, ४७८ किलो गांजा अन् ओडिशापर्यंत पोहोचलेले जाळे!
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here