“शिवकालीन शौर्याच्या साक्षीने बारामतीत नाभिक समाजाचा भव्य वधू-वर सुचक मेळावा; समाज एकतेचा ऐतिहासिक सोहळा!”
बारामती (प्रतिनिधी) – बारामतीत नाभिक समाजाच्या इतिहासातील एक संस्मरणीय आणि गौरवशाली क्षण शनिवारी साक्षीदार ठरला! महाराष्ट्रीय नाभिक महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका नाभिक संघटना, श्री संतसेना नागरी सहकारी पतसंस्था, कै. प्रदीप कृष्णाजी यादव कै. सौ. शालन यादव ट्रस्ट, वीरभाई कोतवाल हाऊसिंग सोसायटी अशा अनेक प्रतिष्ठीत संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दि. २४ मे रोजी “भव्य वधू-वर सुचक मेळावा” उत्साहात संपन्न झाला!


हा मेळावा साधा-सुधा नव्हता! श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे शुरवीर शिवाजी काशिद व जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त झालेला हा मेळावा म्हणजे इतिहास, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संगमच! कार्यक्रमाची सुरुवात बारामतीतील कसबा येथील शिवछत्रपती उद्यान येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार , मानवंदना देऊन.तसेच मर्द मावळ्यांच्या प्रतिमापूजनाने झाली. दीप प्रज्वलनाने वातावरणच भारून गेले. अध्यक्षस्थानी होते महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे तेजस्वी अध्यक्ष मा. ना. कल्याणराव दळे, तर विशेष उपस्थितीत होते राजवर्धन शिंदे (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती तालुका).


सकाळपासूनच पाहुण्यांचे स्वागत चहा-नाश्त्याने झाले. महिलांसाठी संगीत खुर्चीचा धमाल कार्यक्रम झाला. सोन्याची नथ, चांदीचा कॉईन, मेकअप किट अशी भरगच्च बक्षिसं यामध्ये देण्यात आली! महिलांनी दिलखुलास सहभाग दाखवला. संजय दुधाळ यांच्या वतीने राऊत या विद्यार्थ्यास सायकल भेट देण्यात आले.
दुपारी दोन वाजता स्नेहभोजन, आणि त्यानंतर तीन वाजता सुरू झाला मुख्य कार्यक्रम – मुले-मुली पाहण्याचा सजीव सोहळा! बारामती दूध संघ मंगल कार्यालय साक्षीदार ठरले समाजाच्या नव्या वाटचालीचे. राज्यभरातून आलेल्या वधू-वर इच्छुक, पालक, समाजबांधवांनी सभागृह गजबजून टाकले!
प्रा. सुरेश साळुंखे सर यांनी केले प्रास्ताविक, तर सूत्रसंचालन उत्तमरित्या सांभाळले संतोष राऊत यांनी.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मान्यवरांनी समाजाला दिला प्रेरणादायी संदेश. प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरक्षक वीर जीवा महाले स्मारक राज्य सरकारने तात्काळ उभारावे . स्वातंत्र्य सेनानी वीरभाई कोतवाल यांच्याही स्मारक त्वरित उभारावे
कल्याणराव दळे यांनी सांगितले, “आजचा कारागीर वर्ग महिन्याला कमीत कमी ३०-४० हजार जास्तीत जास्त लाखाच्या पुढे उत्पन करतो आहे.सहज मिळवतोय. समाजातील मुलींनी हे समजून घेत सकारात्मक निर्णय घ्यावेत. असे वधू वर सूचक मेळावे महाराष्ट्रातील अधिकारी व्हावे त. महिलांनी प्रतिनिधित्व वाढवावे, संघटना मजबूत कराव्यात!”ओबीसी महामंडळाचा अध्यक्ष हा नाभिक समाज चा झाला पाहिजे असेही ते म्हणाले स्वाभिमान जपा बांधवा व संख्येवर नाही तर बुद्धीवर राजकारण व्हावे संघटनात्मक लोकशाहीत राज्यकर्ते व्हावे व होता आले पाहिजे असेही त्यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बारामती तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी आपल्या भाषणातून जनतेचे मन जिंकले. म्हणाले, “हा मेळावा इतर समाजासाठीही आदर्श ठरेल. समाजातील अडचणी, समस्या प्रश्न मला द्याव्यात, मी त्या थेट अजितदादा पवार व खासदार सुनेत्राताई पवार यांच्यापर्यंत पोहोचवेल आपल्या भावना पक्षश्रेष्ठीकडे पोहोचवेल असे सांगितले.
अनेक उपस्थित मान्यवरांची मांदयाळी लाभली होती…
अध्यक्ष:रमेश राऊत (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, उपाध्यक्ष सुनील जगताप,. मा.बा.ग्रा. अध्यक्ष पै. गणेश काशीद नाभिक महामंडळ)
अध्यक्ष:सौ. मंगल आढाव, सौ. राजश्रीताई जगताप
अध्यक्ष:महेश वारुळे, नवनाथ आपुणे किरण चौधरी (संतसेना पतसंस्था)
अध्यक्ष:रविंद्र सूर्यवंशी, सुनील माने (वीरभाई कोतवाल हौ. सोसायटी)
अध्यक्ष:सुधाकर माने, सुदाम कढणे, किरण कर्वे (नाभिक संघटना) बारामती ग्रामीण नाभिक महामंडळ अध्यक्ष धिरण पवार
अध्यक्ष:अनिल दळवी, हेमंत जाधव कै. प्रदीप यादव व कै. शालन कृष्णाजी यादव ट्रस्ट (वधू-वर सूचक मंडळ)
प्रा.दत्तात्रय जाधव, किशोर शिर्के शिवाजी राऊत (वधू वर सूचक मंडळ बारामती)
संतोष शिंदे (इंडियन रिपोर्टर असोसिएशन)
व अधिकाधिक समाजबांधव व उत्साही युवक-युवतींचा सहभाग!
कार्यक्रमाचा शेवट झाला सुदाम कढणे सरांच्या आभार प्रदर्शनाने, ज्यांनी समाजातील एकतेचे आणि सहकार्याचे आभार मानले.
या भव्य मेळाव्याने नाभिक समाजाच्या एकतेला नवी दिशा, आणि विवाह संस्कृतीला नवा मार्ग दिला. बारामतीच्या भूमीतून उगम पावलेली ही चळवळ आता राज्यभर झंझावात बनेल यात शंका नाही!
या वधू वर सूचक मेळाव्याच्या कार्यक्रमास परिश्रम बारामती नाभिक संघटनेचे अध्यक्ष पै. सुधाकर माने, ग्रामीणचे धिरन पवार वधुवर सुचक मंडळचे प्रा. दत्तात्रय जाधव ,प्रा. डॉ. सुरेश साळुंके, हेमंत जाधव तसेच
महेंद्र यादव ह. भ. प. राधेश्याम साळुंके आकाश काळे सागर राऊत संतोष साळुंखे श्रीशकुमार शिंदे तसेच बारामतीच्या शहरातील व ग्रामीण भागातील नाभिक बांधवांनी भगिनींनी
तसेच आजी माजी पदाधिकारी सल्लागार जेष्ठ मान्यवर यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित दर्शविली.
