शहर स्वच्छतेसाठी पुढाकार — बारामती नगरपरिषद व एन्व्हॉर्यमेंटल फोरमचा प्रेरणादायी उपक्रम…!

0
38
बारामती नगरपरिषद  कर्मचारी आणि एन्व्हॉर्यमेंटल फॉर्म ऑफ इंडिया सदस्य

शहर स्वच्छतेसाठी पुढाकार — बारामती नगरपरिषद व एन्व्हॉर्यमेंटल फोरमचा प्रेरणादायी उपक्रम!

बारामती, 4 जून:
“स्वच्छ, सुंदर आणि हरित बारामती” या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी बारामती नगरपरिषद आणि एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज (बुधवार, ४ जून) जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर एक भव्य स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे खासदार आदरणीय सौ. सुनेत्रा वहीनी पवार यांच्या पुढाकारातून ही मोहीम उभी राहिली. त्यांनी बारामतीकरांमध्ये स्वच्छतेविषयीची जाण आणि जबाबदारी यांचे महत्व ठसवून दिले.

मेहता हॉस्पिटल ते रेल्वे रुळापर्यंतच्या परिसरात, नगरपरिषदेचे कर्मचाऱ्यांसोबत एन्व्हॉर्यमेंटल फोरमचे सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांनी एकत्र येत रस्ते, बाजूचे परिसर आणि रेल्वे रुळाच्या आजूबाजूचे भाग पूर्णपणे स्वच्छ केले.

या उपक्रमात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, नगरपालिका विभाग प्रमुख, फोरमचे प्रमुख सदस्य तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते.

या उपक्रमाच्या निमित्ताने स्थानिक नागरिकांनी पुढील काळात परिसराची स्वच्छता आणि देखभाल याकडे अधिक लक्ष देण्याचे आश्वासन दिले.

याआधीही बारामती नगरपरिषद व फोरमच्या वतीने वृक्षारोपण, जनजागृती मोहीम, प्लास्टिकमुक्ती उपक्रम यांसारख्या उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आलेली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवारी (ता. ५ जून) पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण उपक्रम पार पडणार आहे. शहराच्या विविध भागांत झाडांची संख्या वाढावी आणि हरित पट्टा निर्माण व्हावा यासाठी फोरमचे सदस्य सतत प्रयत्नशील आहेत.
बारामतीकरांनो, चला एकत्र येऊया, स्वच्छतेचे आणि पर्यावरण रक्षणाचे व्रत घेऊया!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here