व्हिजन सायन्स अकॅडमीत विद्यार्थ्यांना प्रा. वाबळे सरांचे जोशपूर्ण मोटिवेशन
बारामती : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीचा ध्यास घेऊन कार्यरत असलेल्या व्हिजन सायन्स अकॅडमी, बारामती येथे दि. २१ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांसाठी विशेष मोटिवेशन व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
बारामती एमआयडीसी परिसरातील व्हिजन सायन्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. राहुल मराडे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शब्दधन सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्यचे व्याख्याते, निवेदनकार तसेच हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करणारे अभ्यासू प्राध्यापक प्रा. मनोज शिवाजी वाबळे सर यांनी विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा. वाबळे सर यांनी राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, हुतात्मा राजगुरू, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विश्वास नांगरे पाटील आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात कसा अंगीकारावा,ब्रॅड हॉग याने सचिन तेंडुलकरची विकेट काढली व आपल्या बॉलवर सचिन तेंडुलकर याची सही मागितली सांगितले माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठी विकेट असेल त्याच वेळेस सचिन तेंडुलकरचा आपला इगो जागवा होऊन त्याने पुन्हा तुला कधी विकेट देणार नाही असा निश्चय केला असे काही उदाहरण मुलांच्या बाबतीत आपले ध्येय धोरणासाठी सांगितले मोठी स्वप्न बघा आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा खूप मोठे व्हा मित्र तपासा चांगले मित्र जोपासा संगत गुण चांगले विचार चांगले व विद्यार्थ्यांनो मोटिवेशन तुमचे विचार चांगले असावे इंस्टाग्राम व्हाट्सअप फेसबुक यापेक्षा आपल्या करिअरकडे लक्ष द्या आई-वडिलांना डोळ्यासमोर ठेवा त्यांची जिद्द अपार कष्ट असे अनेक याबाबत प्रेरणादायी विवेचन केले.

विद्यार्थी दशेतच आपले ध्येय निश्चित करणे, मोठी स्वप्ने पाहणे, सकारात्मक विचार करणे, वेळेचे नियोजन करणे आणि सातत्याने मेहनत घेणे किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला. कॉलेज जीवनापासून पुढील आयुष्यापर्यंत करिअरची योग्य दिशा कशी निवडावी आणि यशस्वी होण्यासाठी कोणती मानसिकता ठेवावी, याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रा. वाबळे सरांचे जोशपूर्ण आणि प्रेरणादायी विचार ऐकताना विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला. अनेक विद्यार्थी एकाग्रतेने त्यांच्या विचारांमध्ये अक्षरशः तल्लीन झाले होते. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वामुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी व्हिजन सायन्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. राहुल मराडे, संपादक भावनगरी संतोष शिंदे, डॉ. जगताप सर, जोगेश्वरी हॉस्टेल मालक संजय पाटील, अकॅडमीचे सर्व कर्मचारी व स्टाफ तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. नूतन विद्यार्थ्यांचे सत्कार पार पडले

विद्यार्थ्यांच्या मनात मोठी स्वप्ने, सकारात्मक विचार आणि यशाची जिद्द निर्माण करणारा हा मोटिवेशनल कार्यक्रम संस्मरणीय ठरला.



