
विद्या प्रतिष्ठानमध्ये एआय करिअर संधींवरील कार्यशाळा — आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सहभाग
बारामती (प्रतिनिधी) – विद्या प्रतिष्ठान, बारामती यांच्या वतीने दिनांक २० जून २०२५ रोजी सकाळी ९. ३० वाजता ग.दि.मा. सभागृह, विद्यानगरी, एमआयडीसी बारामती येथे “एआय करिअर मार्ग: कृत्रिम बुद्धिमत्तेतील संधींचा शोध घेणे” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. शरदचंद्रजी पवार, अध्यक्ष, विद्या प्रतिष्ठान तसेच अजित पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्रराज्य व सुप्रिया सुळे, खासदार लोकसभा यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी लाभणार आहे.
या कार्यशाळेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील संधी, करिअर मार्गदर्शन, इंडस्ट्रीचे ट्रेण्ड्स, प्रकल्प व संशोधन, आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती दिली जाणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित तज्ज्ञ व्याख्याते आयोजित करण्यात येणार आहेत.
यातील प्रमुख व्याख्याते:
१) श्री. अच्युत गोडबोले – भारतीय उद्योजक आणि लेखक
२) डॉ. आदित्य अभ्यंकर – अधिष्ठाता, प्राध्यापक व प्रमुख, तंत्रज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र
३) डॉ. वेदांत आहलुवालिया – व्यवस्थापकीय संचालक, DATA VIV टेक्नोलॉजीज आदी तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गर्शन लाभणार आहे.
कार्यशाळेची ठळक वैशिष्ट्ये:
(१) आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे परिचय व सर्वच क्षेत्रातील करिअर संधीची माहिती
(२) मशीन लर्निंग, डेटा सायन्स, रोबोटिक्स यांसारख्या क्षेत्रांतील माहिती
(३) इंडस्ट्रीसाठी आवश्यक कौशल्यांचे मार्गदर्शन
(४) विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधकांसाठी उपयुक्त व्याख्याने व सत्रे
(५) प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक सादरीकरणे
(६) आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आरोग्य क्षेत्रासाठी उपयोग
(७) आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कृषी व तंत्रज्ञान क्षेत्रासाठी उपयोग
कार्यशाळेचे उद्दिष्टे:
(१) विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील यशस्वी करिअर घडवू इच्छिणाऱ्या इच्छुक व्यावसायिकांना मार्गदर्शन करणे.
(२ सद्यस्थितीतील AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) उद्योगातील प्रवृत्ती, करिअर मार्ग आणि नवीन संधी याबाबत सखोल माहिती देणे.
(३) AI क्षेत्रातील शैक्षणिक व संशोधनाच्या उपलब्ध संधींवर प्रकाश टाकणे.
(४) प्रगत AI साधने, तंत्रज्ञान, आणि प्रयोगशाळा यांवर प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव उपलब्ध करून देणे.
(५) AI संकल्पनांची व्यावहारिक समज व उपयोग वाढवणारे कौशल्य विकास साधणे.
या कार्यशाळेमार्फत विद्यार्थ्यांमध्ये AI, ML, डेटा सायन्स, क्लाउड कंप्युटिंग, सायबर सिक्युरिटी, आणि डिजिटल इनोव्हेशनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी जागरूकता निर्माण करून, त्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास सज्ज करणे हा मुख्य उद्देश आहे.

एआय कार्यशाळेचे मुख्य दृष्टिकोन हा जगातील सर्वोत्तम संस्था उभारणे, जी मूलभूत संगणक ज्ञान आणि अत्याधुनिक AI नवकल्पना यांच्यामधील दरी भरून काढून, शैक्षणिक,, औद्योगिक आणि सामाजिक परिवर्तन करणे हा आहे.


या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन विद्याप्रतिष्ठान संस्था व, व्हीपीकेबीआयईटी, बारामती यांनी केले आहे. या कार्यशाळेसाठी संपूर्ण राज्यातील जास्ती जास्त विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी सहभाग घ्यावा असे आव्हान विद्याप्रतिष्ठान संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
