विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथे विद्यार्थ्यांसाठी “मानसिक आरोग्य आणि श्वास तंत्र” या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळाचे आयोजन.

विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथे विद्यार्थ्यांसाठी “मानसिक आरोग्य आणि श्वास तंत्र” या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळाचे आयोजन

0
105

विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथे विद्यार्थ्यांसाठी “मानसिक आरोग्य आणि श्वास तंत्र” या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळाचे आयोजन.
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास कक्ष व विद्युत अभियांत्रिकी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ०६ फेब्रुवारी २०२४ रोजी विद्यार्थ्यांसाठी “मानसिक मानसिक आरोग्य आणि श्वास तंत्र ” या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून भारताच्या गुणवत्ता परिषदेने आयुष मंत्रालयाच्या वतीने योग शिक्षक म्हणून मान्यता असलेले तसेच मार्च २०१९ चा एन्व्हायर्न्मेंटल फोरम ऑफ इंडिया (NGO) ‘बारामती आयकॉन’ पुरस्कार तसेच फेब्रुवारी २०२२ रोजी योग केंद्र सांगली येथे ‘योग भूषण’ पुरस्काराने सन्मानित, संचालक, आयुर्वेद योग रुग्णालय व योग महाविद्यालय, बारामती, हे प्रमुख अतिथीं म्हणून लाभले होते. अतिथींचा सत्कार प्रा. पूजा जैस्वाल, विभाग प्रमुख विद्युत अभियांत्रिकी शाखा यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी रितेश साखरे याने केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्रुती केकाण हिने करून दिला. डॉ. निलेश महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानांमध्ये रोजच्या जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी श्वसनाचे व्यायाम हे एक उत्तम साधन आहे याची प्रामुख्याने जाणीव करून दिली. श्वास व ध्यानधारणा यामुळे मानवाला प्रत्येक पेशीला प्राणवायू मिळतो आणि त्यामध्ये नवजीवनाचा संचार होतो, तसेच नकारात्मक विचारांना शरीराच्या बाहेर काढून टाकले जाते, तणाव, वैफल्य आणि क्रोध यापासून मुक्ती मिळते, अस्वस्थता, निराशा आणि सुस्ती नाहीशी होते, मन आणि शरीर या दोहोंना त्याचा फायदा होतो व त्यामुळे माणसाचे मानसिक आरोग्य चांगले राहते हे उपस्थितांना पाठवून दिले. तसेच पंचकोश शुध्दिकरणाची गरज का असते या विषयी माहिती दिली. आपण जसे विचार करतो तशीच आपण कृती करतो म्हणून आपण अगोदर चांगले विचार केले पाहिजेत, तसेच आपण स्वतःला चांगले ओळखलं पाहिजे व परस्परांना समजून घेतलं पाहिजे असे मौलिक विचार त्यांनी या कार्यशाळेत व्यक्त केले. तसेच या कार्यशाळेत त्यांनी उपस्थितांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. या कार्यशाळेत जास्तीजास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेसाठी प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ह्या कार्यशाळेसाठी विद्युत अभियांत्रिकीचे प्रा. दीपक येवले, प्रा. पूजा जैस्वाल यांनी विशेष मेहनत घेतली.

Previous articleरोशनी जिंदगी की…
Next articleराज्य उत्पादन शुल्कच्या मोहिमेत गावठी दारूसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here