‘वारकऱयांची सेवा हीच विठ्ठलसेवा’ या भावनेतून हजारो वारकऱयांची ‘चरणसेवा’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला आले मुर्त रूप….

0
13

‘वारकऱयांची सेवा हीच विठ्ठलसेवा’ या भावनेतून हजारो वारकऱयांची ‘चरणसेवा’

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला आले मुर्त रूप

प्रतिनिधी । पुणेः
पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या हजारो वारकऱ्यांच्या थकलेल्या पायांची सेवा करून त्यांना विश्रांती देण्याचे काम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या चरणसेवेतून केले जात आहे. पुणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमातून ही सेवा शहरातील विविध ठिकाणी देण्यात आली.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पुणे यांच्या पुढाकाराने शहरातील १० ठिकाणी घेण्यात आलेल्या शिबीरांमध्ये १०३७ विद्यार्थी व स्वयंसेवकांनी सेवा बजावली, तर १५ हजाराहून अधिक वारकऱ्यांना या सेवेचा लाभ घेतला.

सेवेचा अनोखा संगम
‘वारकऱयांची सेवा हीच विठ्ठलसेवा’ या भावनेने प्रेरित होऊन विविध वैद्यकीय, फिजिओथेरपी, आयुर्वेद व नर्सिंग महाविद्यालयातील मोठ्या संख्येतील तरुणांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. वारकऱ्यांची फिजिओथेरपी, थकवा कमी करणाऱ्या मसाज आदी पद्धतींद्वारे तसेच मानसिक ऊर्जा वाढवणारे संवाद साधून वारकऱ्यांची सेवा करण्यात आली.
याठिकाणी केली सेवा
पुण्यातील पारगे चौक, कसबा गणपती, कस्तुरी चौक, नानापेठ, रामोशी गेट, सह्याद्री मैदान, गंगाधाम रोड, काशेवाडी, मार्केटयार्ड आणि गंगाधाम चौक या ठिकाणी ही शिबिरे यशस्वीपणे पार पडली. या उपक्रमात ढोले पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय,भारती विद्यापीठ, संचेती कॉलेज, सिंहगड संस्था, रंगूनवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, ब्रिजलाल जिंदाल फिजिओथेरपी, डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, सुर्यदत्ता संस्था, ससून हॉस्पिटल, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, नवले शिक्षण संस्था,सेवांकुर भारत यांसारख्या नामांकित संस्थांनी सहभाग घेतला होता.

फोटोओळी—- आरोग्य आणि चरणसेवा उपक्रमाच्या माध्यमातून वारकऱयांची सेवा करताना आरोग्य अधिकारी कर्मचारी दिसत आहेत आरोग्य आणि चरणसेवा उपक्रमाच्या माध्यमातून वारकऱयांची सेवा करताना आरोग्य अधिकारी कर्मचारी दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here