बारामती : लडकत सायन्स अकॅडमी, बारामती यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी “लडकत 10वी बोर्ड परीक्षा वर्कशॉप 2026” चे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा चालू वर्षी इयत्ता 10वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः उपयुक्त ठरणार आहे.
या कार्यशाळेत गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांचे जलद पुनरावलोकन, तसेच NEET / JEE / CET या स्पर्धा परीक्षांसाठी करिअर मार्गदर्शन दिले जाणार आहे. सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यास प्रमाणपत्र देण्यात येईल.
कार्यशाळा 28 व 29 ऑक्टोबर 2025 रोजी, सकाळी 9.00 ते सायं. 5.00 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.
रेसिडेंशियल शुल्क ₹300 तर नॉन-रेसिडेंशियल शुल्क ₹100 इतके नाममात्र ठेवण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे स्थळ आहे — लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन, MIDC, बारामती.
लडकत सायन्स अकॅडमी मार्फत इयत्ता 12 वी नंतरच्या मेडिकल इंजिनियरिंग प्रवेशासाठीच्या स्पर्धा परीक्षा NEET JEE MHT-CET या साठी 11वी सायन्स प्रवेशा सोबत कोचिंग दिले जाते , तसेच इयत्ता 5 वी पासूनच फाउंडेशन बॅचेस साठी प्रवेश सुरू आहेतं
संस्थेचे संचालक नामदेव लडकत सर यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की,
“या कार्यशाळेत सहभागी होऊन 10वी बोर्ड परीक्षेची तयारी अधिक प्रभावी करून आणि आपल्या यशाचा पाया भक्कम करा.”
नोंदणीसाठी QR कोड स्कॅन करा.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9545 95 2547




