मतदार युवकांनो बंधु भगिनींनो
निवडणुका जाहिर झाल्या मतदान करायला तुम्ही गेलेच पाहिजे.मतदान करण्यासाठी अनेक राजकिय पुढारी आपला ब्रेनवाॅश करण्यासाठी भाषण करतील ते ऐकायला तुम्हाला जावंच लागेल किंवा न्यायला वाहन येईल वाहनात बसुन गेला तर ठिक नाही तर वहाण देखील खावी लागेल.
भाषण ऐकताना कान देऊन ऐका उगा! वाऱ्यावरती उडतो तुझा झगा ग झगा ग! गाणं ऐकल्या सारखे भाषण ऐकु नका कारण हे भाषण कोणी वास्तव करीत असतात. कोणी अवास्तव करीत असतात कोणी टाकणार विस्तव कोणी भाषण करणार कारणास्तव!
भाषण ऐकताना शेजारच्याचे हि ऐकावे लागेल तो म्हणेल नेता मस्त मस्त!जरी त्याने खाऊन खाऊन सारंच केलेलं असेल फस्त!नेत्याने टाकलेली असती त्यांच्यावर तुमची भिस्त!महागाई किती हि असु द्या या काळात भाषण ऐकायला मिळेल स्वस्त! परंतु त्यात काही नसणार रास्त !ऐकत राहा होऊन बिनधास्त !
ऐकताना बिघडु देऊ नका तुमचे स्वास्थ! होऊ नका अस्वस्थ!कारण आता तुम्हाला शोधायची लोकशाही रास्त!कारण ठोकशाहीने लोकशाहीचा होऊ लागला अस्त! लोकशाही होऊ द्यायची नाही उध्वस्थ! त्यासाठीच मतदान करायचे आहे बिनधास्त!
आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता