बौद्धिक क्षमता तपासूनच करिअरची निवड करावी- हेमचंद्र शिंदे
भारतीय जैन संघटना, बारामती – ‘करिअर कम्पास’ फौंडेशन कार्यक्रम
भारतीय जैन संघटना (BJS), बारामतीच्या महिला व पुरुष विभागातर्फे आयोजित चौथा फौंडेशन कार्यक्रम “करिअर कम्पास” नुकताच अनेकांत इंग्लिश मिडियम स्कूल, बारामती येथे यशस्वीरीत्या पार पडला.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. हेमचंद्र शिंदे यांनी ९वी व १०वी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक सत्र घेतले. अभ्यासातील प्रभावी तंत्र, स्पर्धा परीक्षांची तयारी, अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करणे आणि योग्य करिअर निवड याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मोठी स्वप्ने ही पाहिलीच पाहिजेत परंतु त्यासाठी बौद्धिक क्षमता तसेच जिद्द चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी आहे का हे पाहिले पाहिजे. त्यांचे वास्तववादी मार्गदर्शन आणि प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांनी विशेषत्वाने गौरवले.

या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट हेड म्हणून प्रा. राहुल शहा (पंदारकर) व प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून श्री. यश संघवी व सौ. बिजल दोशी यांनी काम पाहिले.
तसेच BJS बारामती शाखा अध्यक्ष – श्री. सम्यक छाजेड, महिला अध्यक्षा – सौ. गीतांजली शहा यांचेही सहकार्य लाभले. सोबतच सचिव रमेश मुथ्था, उपाध्यक्ष श्री. विपुल शहा (वडुजकर), श्री. स्वप्नील पहाडे, अजित बेदमुथा, सचिव सौ. नंदिता शहा, अर्चना सराफ, लता ओसवाल, संगीत मेहता, अर्पण दोशी, शीतल धोका, कोमल कोठारी यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात BJS बारामतीच्या महिला व पुरुष विभागाचे पदाधिकारी, सदस्य आणि स्वयंसेवक यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.
उपस्थित विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला व अनेक विद्यार्थ्यांनी नव्याने शिक्षण व करिअरबाबतची दिशा व प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.

‘करिअर कम्पास’ ही BJS संस्थेच्या तिथिग्राम उपक्रमाचा एक भाग आहे, ज्याद्वारे सामाजिक, शैक्षणिक, मार्गदर्शन व कौशल्य विकास यामार्फत भावी पिढी सक्षम व समर्थ बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
इंजि. हेमचंद्र शिंदे
प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक बारामती
9405111555
