बारामती ट्राफिकचे पो. नि.”चंद्रशेखर यादव यांचा नंबर 9923630652 बारामतीकरांसाठी ठरत आहे ‘एक कॉल सोल्युशन’ – आता तक्रार करा, उपायही सुचवा!”

0
92

बारामती ट्राफिकचे पो. नि.”चंद्रशेखर यादव यांचा नंबर 9923630652 बारामतीकरांसाठी ठरत आहे ‘एक कॉल सोल्युशन’ – आता तक्रार करा, उपायही सुचवा!”

बारामती (प्रतिनिधी):
बारामती शहराच्या रस्त्यावर गोंधळ, जाम, चुकीचं पार्किंग, अभाव… अशा असंख्य वाहतूक समस्यांनी नागरिक त्रस्त होते. पण आता या सगळ्यावर एकच उत्तर आहे – पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा मोबाईल नंबर!

वाहतूक शाखेचे हे करारी आणि तत्पर अधिकारी यांनी नागरिकांसाठी आपला मोबाईल क्रमांक जाहीर केला, आणि त्यानंतर नागरिकांच्या तक्रारी ‘व्हॉट्सॲप-एसएमएस-फोन’च्या माध्यमातून सातत्याने त्यांच्या पर्यंत पोहोचत आहेत. विशेष म्हणजे या तक्रारी केवळ ऐकल्या जात नाहीत, तर त्यावर तात्काळ अ‍ॅक्शन घेतली जाते.

“तक्रार करा, पण उपायही सुचवा!” – ही भूमिका घेत यादव नागरिकांना केवळ समस्या मांडायला नव्हे, तर उपाययोजनांमध्येही सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत.


कोठे चुकीचं पार्किंग आहे? कुठे सिग्नल हवा आहे? वनवेचं उल्लंघन कुठे होते? याची माहिती नागरिकांनी थेट पोलीस निरीक्षकांना कळवायची आहे.

यादव यांचं काम पाहून अनेकांना वाटू लागलं आहे की –
“या नंबरला पाठवा, आणि काम नक्की होईल!”
त्यामुळे आज यादव यांचा मोबाईल ‘नागरिकांच्या तक्रारींसाठी हॉटलाइन’ ठरत आहे.

वाहतूक शाखेचं पुढचं पाऊल ठरणार आहे ‘सर्वेक्षण मोहीम’, जिथे बारामतीकरांची मते, सुचना, आणि अनुभव गोळा करून वाहतुकीचं नवं आणि शिस्तबद्ध मॉडेल तयार केलं जाणार आहे. या

अभियानात नागरिकांनी सहभाग घ्यावा, हे आवाहन वाहनचालक, व्यापारी, आणि स्थानिक रहिवासी यांना उद्देशून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here