बारामती – जळोची निर्यात सुविधा केंद्रातून १८० टन आंब्यांची लंडन-अमेरिकेत यशस्वी निर्यात!
बारामती –
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बाजार समितीचे मार्गदर्शक अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या जळोची उपबाजार येथील निर्यात सुविधा केंद्राने यंदा पुन्हा एकदा यशस्वी निर्यात करून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. एप्रिल २०२५ अखेर या केंद्रावरून तब्बल १८० टन आंबा लंडन आणि अमेरिका येथे निर्यात करण्यात आला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती विश्वासराव आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी दिली.

या निर्यातीसाठी रेन्बो इंटरनॅशनल प्रा. लि., पुणे या नामांकित कंपनीने पुढाकार घेतला असून, निर्यातक्षम व रेसिड्यू फ्री आंबा उत्पादक शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन निर्यातदार अभिजित भसाळे यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, “निर्यातीस पात्र आंबा असल्यास शेतकऱ्यांनी रेन्बो इंटरनॅशनलशी संपर्क साधावा आणि आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या मालाला स्थान मिळवावे.”

या सुविधा केंद्राची स्थापना सन २०१४ मध्ये करण्यात आली असून, मागील वर्षीच या केंद्रावरून ४८५ टन आंब्यांची निर्यात ऑस्ट्रेलिया, लंडन, अमेरिका युरोप येथे झाली होती. विशेष म्हणजे, या आंब्यांचे आकर्षक पॅकींग “आमगो” या ब्रॅण्डखाली करण्यात येते, ज्याला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे.

यंदाच्या हंगामात आतापर्यंत ७५ टन आंबा लंडन येथे तर १०५ टन अमेरिका व युरोप येथे पोहोचला आहे.
शेतकरी बांधवांनी आपल्या निर्यातक्षम आंब्याच्या विक्रीसाठी रेन्बो इंटरनॅशनलचे सुभाष पवार – ८८८८७०९६७० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी केले.

बारामतीच्या या यशामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात स्थानिक उत्पादनाची चव पोहचत असून, शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाची संधी निर्माण होत आहे. हे सर्व यश अजितदादांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले आहे,

