बारामती चा विकास हाच अजित दादा चा ध्यास… केशव (बापू ) जगताप

0
23

बारामती चा विकास हाच अजित दादा चा ध्यास… केशव बापू जगताप

बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकास हाच अजित दादा पवार साहेब यांचा ध्यास आहे यामुळे विकास कामांचा झपाटा सुरू आहे..असे प्रतिपादन माळेगांव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अँड केशवराव बापू जगताप यांनी गुणवडी गावातील काळा पुल ते घोरपडे पांद डोरलेवाडी रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्त्याचे काम भूमिपूजन प्रसंगी केले.. अध्यक्षस्थानी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजवर्धन दादा शिंदे होते. प्रमुख उपस्थितीत छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतदादा काटे, माजी अध्यक्ष नितीन शेंडे, बारामती मार्केट कमिटी चे सभापती विश्वासराव आटोळे होते. प्रारंभी जेष्ठ नेते भारत बापू गावडे पाटील यांनी प्रास्ताविक केले त्यांनी सांगितले की या रस्त्याच्या कामासाठी अजित दादांनी ७ कोटी ७९ लाख रुपये मंजूर केले असून हे काम दर्जेदार झाले पाहिजे. राजवर्धन शिंदे म्हणाले की हा रस्ता दर्जेदार होण्यासाठी शेजारील शेतकर्यांनी सहकार्य करावे. नितीन शेंडे यांनी सांगितले की अजित दादा पवार कुठल्याही विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देत नाहीत . जेष्ठ नेते विश्वनाथ भाऊ गावडे माजी पंचायत समिती सदस्य भारत नाना गावडे ,छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, पत्रकार दिलीप राव शिंदे, सरपंच अर्चना रविंद्र घोडे माजी सरपंच सत्यपाल गावडे, नवनाथ गावडे, मधुकर होले, वैजनाथ गावडे, विशाल गावडे ,सुयश गावडे ,संजय फाळके ,


कालीदास गावडे,संदेश गावडे, धोंडीराम पवार सर, सुनील गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन गावडे, तसेच सर्व ग्रापंचायत सदस्य व कर्मचारी गुनवडी – डोरलेवाडी येथील परिसरातील बहुसंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच
ठेकेदार डी पी जगताप व त्यांचे सहकारी आणि अधिकारी शेडगे साहेब हे ही उपस्थित होते त्यांनी सदरचे काम हे सव्वा पाच किमी लांबीचे व दर्जेदार होणार अशी माहिती दिली असून त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व आनंद व्यक्त केला. उपस्थित सर्वांचे आभार माजी सभापती संदीप तात्या बांदल यांनी मानले 🙏🌹🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here