
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम!
बारामती | ५ जून २०२५
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे आज वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हरित बारामतीच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकत, समितीने परिसरातील बाजार आवरात झाडांचे रोपण केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन बाजार समितीचे सभापती मा. श्री. विश्वास आटोळे उपसभापती रामचंद्र खलाटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बाजार समितीचे कर्मचारी संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने करण्यात आले असून, प्रत्येक रोपाची निगा राखण्याची जबाबदारी विशिष्ट कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.




“जमिनीवर हिरवळ निर्माण केली, तर भविष्यातील पिढ्यांसाठी जीवन सुरक्षित होईल”, असे प्रेरणादायी पर्यावरणपूरक प्रजातींची निवडक झाडे लावण्यात आली.
यावेळी सचिव अरविंद जगताप बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांनी या उपक्रमाचे महत्त्व उलगडून सांगताना पुढील काळात अधिक ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या उपक्रमामुळे पर्यावरण जागरूकता वाढवण्याबरोबरच शाश्वत विकासासाठी स्थानिक संस्था पुढे सरसावल्या पाहिजेत, असा संदेश समाजात गेला आहे. यावेळी कर्मचारी हौसराव कोकरे, सूर्यकांत मोरे, संतोष मोकाशी, किरण कुदळे ,शरद भोसले, दयावान वदक ,अक्षय कुर्ले ऋतुराज टेंगले अजय भिसे अदिच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला .