Homeलेखबारामती कृषी उत्पन्न बाजार समिती - "शेतकऱ्यांच्या प्रगतीची स्मार्ट बाजार समिती" --सभापती...

बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती – “शेतकऱ्यांच्या प्रगतीची स्मार्ट बाजार समिती” –सभापती सुनील पवार

बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती – “शेतकऱ्यांच्या प्रगतीची स्मार्ट बाजार समिती”

देशातील शेतकऱ्यांचे आधारस्तंभ शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे विकासरत्न अजितदादा पवार, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली “शेतकरी” केंद्रबिंदू मानून सन १९३५ साली स्थापन झालेली बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची ८८ वर्षे यशस्वी वाटचाल चालू आहे.
मागणी आणि पुरवठा या तत्त्वानुसार नव संकल्पनांची कास धरून, कष्टाळू शेतकऱ्याला अधिक घामाचा दाम मिळवण्यासाठी समिती प्रयत्नशील आहे. शेतमालाला योग्य भाव मिळवून देणारे व्यापारी, शेतमालाचे ओझे पाठीवर घेणारा हमाल, अचूक व चोख माप करणारा मापाडी, समितीचा कार्यक्षम सेवक वर्ग ही समितीच्या रथाची गतीने चालणारी चार चाके आहेत. आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात 100% संगणकीकृत कामकाजा बरोबरच ई-नामच्या माध्यमातून आंतरराज्यातून ऑनलाईन बिडिंग, ऑनलाईन पेमेंट तसेच सोशल मीडियाचा वापर करून फेसबुक, व्हाट्सअप, वेबसाईट, मोबाईल ॲप्लिकेशन या आधुनिक प्रणाली द्वारे परराज्यातील व बाहेरील बाजारपेठेतील खरेदीदार आकर्षित होत आहेत. पारदर्शक व्यवहाराद्वारे शेतमालाचा गतीने उठाव होऊन राज्यातील सर्वोत्तम भाव काढणारे सौदे समितीच्या बाजारात होऊन आधुनिक बाजारपेठेत बारामतीचे एक यशस्वी पाऊल पडत आहे. नवीन संचालक मंडळाने समितीचा पुढील पाच वर्षाचा मास्टर प्लॅन करून ध्येय्यपूर्ती वाटचाल सुरू केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीचे भरीव योगदान समितीला मिळत आहे. आधुनिक यांत्रिक चाळणी द्वारे भुसार मार्केटमध्ये निवडलेल्या धान्याला प्राधान्य, शेतकरी प्रशिक्षणाद्वारे विविध नवनवीन जातीचा दर्जेदार भाजीपाला व फळबाजार, कांदा बाजार, यशस्वी लिंबू बाजार, परराज्यातील खरेदीदारांमुळे यशस्वी झालेल्या चिंचेचा बाजार, गेल्या ४० वर्षापासून तालुक्यात असलेल्या संकरित गाईंच्या पैदाशीमुळे नावारूपाला आलेले जनावरे बाजार तसेच गुळ बाजार अशा अनेक प्रकारच्या दर्जेदार शेतमालाचे बारामती बाजार हे खरेदीदारांचे आकर्षण बनले आहे. यामुळे शेतमालाला वाढीव भाव मिळत आहेत. रेशीम कोषसाठी नाविन्यपूर्ण “रेशीम कोष बाजार” सुरू करण्यात आला असून ऑनलाईन बिडिंग द्वारे महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडु येथील रिलर्स प्रत्यक्ष बाजारात न येता ऑनलाईन थेट सहभागी होऊन यशस्वी खरेदी करत आहेत व ऑनलाईन पेमेंट ही करत आहेत. पूर्वी याच शेतकऱ्यांना कर्नाटकच्या रामनगर येथील बाजारात विक्रीसाठी रेशीम कोष घेऊन जावे लागत होते. त्याच्या वाहतूक, श्रम, वेळ व खर्चात बचत झाली आहे. बारामती रेशीम कोष खरेदी केंद्र हे देशातील एकमेव ऑनलाइन विक्री करणारे पहिले यशस्वी केंद्र बनले आहे. शेतकऱ्यांना प्रशिक्षण व रेशीमकोषा पासून धागा व कापड निर्मिती करण्यासाठी रेशीम संचालनालयाच्या वतीने आधुनिक “रेशीम केंद्र” उभारण्यात येत आहे.
बारामतीच्या शेतमालाला आंतरराज्यात व निर्यातीद्वारे अधिकचा दर मिळवण्यासाठी राज्य पणन मंडळाच्या वतीने डाळिंब निर्यात सुविधा केंद्र उभारले आहे. त्याद्वारे सुमारे ४८५ टन आंबा लंडनसह आखाती देशात निर्यात करण्यात आला आहे. जळोची उपबाजारात मॅग्नेट प्रकल्प अंतर्गत राज्यातील पहिला आधुनिकरित्या सोलरसह एकाच छताखाली दहा एकत्रित प्रिकुलिंग कोल्ड स्टोरेजचा महत्वाकांशी भव्य प्रकल्प उभारणी पूर्ण होत असून परिसरातील द्राक्षे, डाळिंब, केळी, पेरू, अंजीर इतर फळे व भाजीपाला बाहेरील बाजारात व निर्यातीस पाठवण्यास वेग येणार आहे. जळोची उपबाजारात नवीन ऑफीस इमारत बांधकाम सुरू आहे. समितीने आकर्षक प्रवेशद्वार, संरक्षक भिंत, डांबरी रस्ते, पर्यावरणपूरक वृक्षारोपण, स्वच्छता यास प्राथमिकता दिलेली आहे. राज्यात प्रथमतः टाकाऊ कचऱ्यापासून निर्माण केलेल्या यशस्वी गांडूळखत प्रकल्पातून शेतकऱ्याला अत्यंत कमी खर्चात रु.५००० टन दराने दर्जेदार कृषि समृद्धी या नावाने गांडूळखत उपलब्ध होत आहे. शेतमालाचे वजनात पारदर्शकता आणण्यासाठी इलेक्ट्रिक वजन काटे, ४० ते ६० क्षमतेचे तीन भूईकाटे, जनावरांच्या आरोग्यासाठी आधुनिक एक्स-रे व ऑपेरेशन सुविधा असलेला “पशु दवाखाना”, शेतकऱ्यांना नाममात्र दरात “रयतभवन मंगल कार्यालय” अशा अनेक सोयी सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
समितीने शेतकऱ्यांच्या “सेस” या मर्यादित आर्थिक उत्पन्नावरच अवलंबून न राहता आर्थिक स्वयंपुर्णतेसाठी बारामती, सुपे, जळोची, उंडवडी या ठिकाणी पाच पेट्रोल पंप व सीएनजी पंप उभारून उत्पन्नाची साधने निर्माण केली आहेत. आवक झालेल्या शेतमालाचे लिलावा पुर्वी वजन, तीन टक्के वार्षिक व्याजदराची शेतमाल तारण योजना, धान्य महोत्सव, १००० टन क्षमतेची आधुनिक तीन गोदामे, स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आरओ फिल्टर, उपहारगृह, शिवभोजन थाळी याद्वारे नाममात्र दरात जेवण असे उपयोगी उपक्रम राबवले आहेत. शेतमालाची चोख विक्री करून लिलावाच्या पट्टीचे ताबडतोब पैसे देणारे व्यापारी यामुळे बारामती व परिसरातील शेतकरी निश्चिन्तपणे आपला शेतमाल बारामतीच्या बाजारात विक्रीसाठी आणन्यास प्राधान्य देत आहेत.
या सर्व कार्यात उपसभापती निलेश लडकत संचालक विनायक गावडे, बापुराव कोकरे, रामचंद्र खलाटे, दयाराम महाडिक, सतिश जगताप, दत्तात्रय तावरे, शोभाताई कदम, प्रतिभाताई परकाळे, शुभम ठोंबरे, विशाल भोंडवे, विश्वास आटोळे, अरूण सकट, युवराज देवकाते, मिलिंद सालपे संतोष आटोळे, नितीन सरक, सहाय्यक निबंधक मिलिंद टांकसाळे, सचिव अरविंद जगताप व समितीचे सेवक तसेच व्यापारी, हमाल, मापाडी व शेतकरी वर्ग आणि इतर बाजार घटक यासर्वांचे मोलाचे सहकार्य मिळते. समितीची मुख्य बारामती आवारात २६ एकर, जळोची उपबाजारात ४१ एकर, सुपे उपबाजार येथे ३ एकर पूर्वीची व नवीन १७ एकर जागेवर बाजार व प्रकल्प सुरु आहेत. झारगडवाडी येथे नवीन २६ एकर जागा नियोजित आधुनिक जनावरे बाजारासाठी समितीस उपलब्ध झाली आहे. शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेल्या यासर्व सोयी सुविधांमुळे राज्य पणन मंडळाने मानांकित केलेल्या तीनशे पाच बाजार समित्यांमध्ये यावर्षी बारामतीला राज्यात सर्वोत्तम प्रथम क्रमांकाची “स्मार्ट बाजार समिती” घोषित करून बारामती बाजार समितीच्या पेचात मानाचा तुरा बसवला आहे हे सांगण्यास अत्यानंद होत आहे.

        आपला विश्वासु 

श्री. सुनिल वसंतराव पवार 
           सभापती

बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती
मोबा. नं. 9420076000

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on