शेतमालाची विक्री हमीभाव पेक्षा कमी होऊ नये याबाबत शेतक-यांची मागणी…!
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजार आवारात मका, ज्वारी, बाजरी, गहु, उडीद व इतर भरडधान्य तसेच सुर्यफुल, सोयाबीन, करडई इत्यादी शेतक-यांचा शेतमाल विक्रीस येत आहे. सदर शेतमालाचे दर हे उघड लिलाव पद्धतीने प्रतवारी पाहुन तसेच मागणी व पुरवठा यानुसार निघतात. परंतु समितीचे बाजार आवारात आवक होत असलेल्या काही सर्वसाधारण दर्जाच्या शेतमालाची विक्री हमीभावा पेक्षा कमी दराने होत आहे.
सर्वसाधारण दर्जा असलेल्या शेतमालाची विक्री हमीभाव पेक्षा कमी होऊ नये याबाबत शेतक-यांची मागणी आहे. याबाबत समितीने शासनाकडे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करणे बाबत विनंती केली आहे अशी माहिती समितीचे सभापती सुनिल पवार आणि उपसभापती निलेश लडकत यांनी दिलीबारामती बाजार समितीने शासनाचे मार्फत हमीभावा पेक्षा कमी दराने विक्री होत असलेल्या काही शेतमालाकरिता शासकीय खरेदी केंद्र सुरू करणे बाबत मा. जिल्हाधिकारी, मा. तहसिलदार तसेच जिल्हा उपनिबंधक, पुणे ग्रामीण यांचेकडे पत्रव्यवहार केला आहे. शेतमाल ठेवणे करिता बारामती बाजार समितीने शेतमाल तारण कर्ज योजना सुरू केली आहे.
ज्या शेतक-यांना या योजनेत सहभाग घ्यावयाचा आहे. त्यांनी आपला शेतमाल वाळवुन व स्वच्छ करून गोणपाटाच्या पिशवीत शेतमाल गोडाऊन मध्ये ठेवुन त्यावर बाजारभावाच्या ५० टक्के रक्कम ३% व्याज दराने देणेचा निर्णय बारामती बाजार समितीने घेतला असल्याने या योजनेचा लाभ घ्यावा. शेतमाल तारण योजने मध्ये ठेवलेला शेतमालास गोडाऊन भाडे आकारले जात नाही. तसेच ठेवलेल्या मालाची निर्जुतुकीरण बाजार समिती तर्फे करण्यात येत असल्याने सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले