बारामतीत होल्डिंग फ्लेक्सचा धुमाकूळ…! संबंधित
प्रशासनाचे डोळेझाकपणा…?
प्रतिनिधी:
बारामती शहर हे जगात, देशात तर राज्यातील एक विकसित, हरित, स्वच्छ आणि सुशोभित शहर म्हणून ओळखले जाते. मात्र सध्या या शहराच्या रूपाला ‘होल्डिंग फ्लेक्स’चा कुरूप विळखा पडलेला दिसतो आहे. शहरातील प्रत्येक चौकात, शाळा कॉलेजेस महाविद्यालय मुळे लोकसंख्येत व रहदारीचे वाहनांचे प्रचंड प्रमाणात वाढ त्यातच वाढदिवसाच्या पोस्टर्स, निवडीचे बॅनर्स , विविध कार्यक्रमाचे , शुभेच्छा बॅनर्स विविध प्रचाराचे फ्लेक्स यामुळे बारामतीचे सौंदर्य विद्रूप झाले आहे.
प्रश्न एकच — संबंधित प्रशासन डोळेझाकपणा करत आहे का? शहराच्या विविध चौका चौकात फ्लेक्स झळकत असून, यामध्ये कोणतेही नियमन दिसून येत नाही. दिवसेंदिवस हे बोर्ड कायमस्वरूपीच लावल्याचे चित्र आहे, आणि वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन लहानमोठे अपघातही घडत आहेत.
बारामतीच्या शहरात पावसाळ्याच्या तोंडावर विविध फ्लेक्स बोर्डमुळे धोकादायक स्थिती!
सध्या वातावरणात वादळी वाऱ्याचे आहे. अशावेळी हे फ्लेक्स व होल्डिंग ढासळून कुणाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आत्ताच खबरदारी घ्यावी लागेल. मात्र प्रशासन अद्याप झोपेत असल्याचा आरोप सुजाण नागरिक करत आहेत.
“फ्लेक्सचे नियम केवळ कागदावर?”
शहरात एक ना अनेक दिवस फ्लेक्स झळकत असतील, तर यात प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरते. फ्लेक्स काढण्यासाठी नियोजित कालावधी नसतो का? शहराच्या सौंदर्याशी खेळ करत अनेकजण बिनधास्तपणे पोस्टर्स लावत असतील तर हे केवळ ‘गोड बंगाल’ नाही तर लोकशाहीचा उपहास आहे.
“भावनगरी च्या माध्यमातून सुज्ञ बारामतीतील नागरिकांचा आक्रोश!”
शहरातील व परिसरातील नागरिकांनी थेट प्रशासनाला सवाल केला आहे –
“शहराच्या सौंदर्याला गालबोट लावणाऱ्या या फ्लेक्सवर कुणाचे नियंत्रण नाही काय? दिवसेंदिवस हा रोग बळावत आहे. जर प्रशासन आत्ताच जागं झालं नाही तर उद्या या फ्लेक्समुळे कोणाला इजा दगा फटका बसला तर त्या निष्पाप नागरिकांची जबाबदारी कुणाची?”
बारामतीकरांनी दबक्या आवाजात आमच्या माध्यमातून प्रशासनाकडे मागणी होत आहे की —सर्व फ्लेक्ससाठी मुदतीची कडक अंमलबजावणी करण्यात यावी.
प्रत्येक चौकात फ्लेक्ससाठी निश्चित जागा असावी.
धोका निर्माण करणारे अनधिकृत फ्लेक्स त्वरित हटवावेत.व आर्थिक दंड व गुन्हे दाखल व्हावेत. आशयाची नागरिकांतून मागणी होत आहे.
बारामतीच्या सौंदर्याला गालबोट लावणाऱ्या या फ्लेक्सराजवर आळा घालण्यासाठी नागरिक सजग झाले आहेत. आता वेळ आहे प्रशासनानेही आपली झोप सोडून जागं होण्याची…!
नाहीतर “फ्लेक्स गोंधळ” हे बारामतीसारख्या यशस्वी शहराच्या माथी लागलेलं काळं कलंक ठरेल!


