बारामतीत व श्री क्षेत्र कन्हेरी येथे मोठ्या भक्तिभावाने हनुमान जयंतीनिमित्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा…

0
58

बारामतीत व व तालुक्यातील जागृत देवस्थान श्री क्षेत्र कन्हेरी येथे मोठ्या भक्तिभावाने हनुमान जयंतीनिमित्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा…

संतोष शिंदे :- बारामती शहरासह पंचक्रोशीत सालाबाद प्रमाणे यंदाही श्री हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः

कन्हेरी (ता. बारामती) | 12 एप्रिल, शनिवार बारामती


श्रीराम भक्त हनुमान जयंतीचा उत्सव श्री क्षेत्र कन्हेरी येथे मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. या पवित्र दिवशी गावातील मंदिर समिती व ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी साडेसहा वाजता श्री कोकाटे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नामस्मरण व भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जन्मोत्सवाच्या निमित्ताने देवाला फुले वाहून विशेष पूजा-अर्चा करण्यात आली. परिसर भजनांनी भारलेला असताना भक्तांचा ओघ अविरत सुरू होता.

यानंतर दिवसभर विविध भक्तिगीत, कीर्तन, हरिपाठ आदी कार्यक्रम पार पडले. उत्सव तदनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात न्हालेला होता. हजारोच्या संख्येने भाविकांनी या उत्सवाला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.ओम नमो भगवते वासुदेवाय नमः

Previous articleअमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा कायापालट
Next articleआयपीएल 2025: कोण बाजी मारणार…..?
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here