बारामतीत राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती साजरी..
बारामती : राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बारामती तालुका स्वातंत्र्यसैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हुतात्मा स्तंभ, वंदे मातरम् चौक येथे गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
यावेळी तहसीलदार स्वप्निल रावडे, ग्राम महसूल अधिकारी श्रीमती म्हसके, एमआयएमचे पुणे जिल्हाध्यक्ष फैयाज इलाही शेख, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अशोकराव इंगुले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस अॅड. आकाश मोरे, अॅड. जी. बी. गावडे, सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर पोटरे, स्वातंत्र्यसैनिक पत्नी लिलावती तावरे, नगरसेविका अविश्वनी सूरज सातव, मंगल शिवाजीराव जगताप, सुप्रिया सोलांकुरे, वैभव कोठारी, नाभिराज कोठारी, सुभाष कोठारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुप्रिया सोलांकुरे यांनी स्वातंत्र्यसैनिक संघटना व स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेला २ हजार रुपयांची आर्थिक मदत केली.
दरम्यान, भटक्या-विमुक्तांचे नेते कै. मारुतराव जाधव प्रतिष्ठान, बारामती यांच्या २४व्या पुण्यतिथीनिमित्त नेवसे रोड, लालबिगे चौक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात स्वातंत्र्यसैनिकांचे उत्तराधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
त्यानंतर लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच स्वातंत्र्यसैनिक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निलेशभाई कोठारी यांचा तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वासराव शेळके, दिलीप तांबे, कबीरभाई तांबोळी, सचिन भोसले, पोपट गादीया, अॅड. मुकुंद बडवे, अॅड. इन्क्लाब शेख, अॅड. रमेश कोकरे, रंजना साळुंके, श्रीराम देशमुख, महावीर शहा, पवन घोरपडे, सदानंद करंदीकर, अक्षय मुळीक, जीवन मोदी, मोहन मोरे, अॅड. अजित कोकरे, फिरोजभाई शेख, अॅड. सोहेल शेख आदींनी सहकार्य केले.




