बारामतीत युरोपची सफर! लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट आता मिशन हायस्कूल मैदानावर

0
12

बारामतीत युरोपची सफर! लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट आता मिशन हायस्कूल मैदानावर

प्रतिनिधी, बारामती
बारामतीकरांसाठी एक अनोखी पर्वणी घेऊन आले आहे डीजे अम्युजमेंट. महाराष्ट्रात प्रथमच, बारामतीकरांना मिळणार आहे लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी – तीही आपल्या गावात, मिशन हायस्कूल मैदानावर!

दरवर्षी नवनवीन कल्पना घेऊन येणाऱ्या डीजे ॲम्युझमेंटने यंदा एक वेगळीच नगरी उभी केली आहे – हुबेहूब लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीटचा देखावा तयार करण्यात आला असून, प्रत्यक्ष लंडन ब्रिजवरून चालण्याचा अनुभवही नागरिकांना घेता येणार आहे.

या भव्य एक्झिबिशनचे उद्घाटन दिनांक २७ जून रोजी सायंकाळी ५ वाजता ज्येष्ठ नगरसेवक श्री. किरणदादा गुजर यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र (आबा) बनकर,बिरजू मांढरे, नगरसेविका सौ. सविता जाधव, द कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ वेस्टर्न इंडिया चे अध्यक्ष श्री. सुजित जाधव, सचिव डॉ. रॉबर्ट गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. आयोजक जयप्रकाश आणि रवींद्रनाथ (रवी) नायर यांनी याबाबत माहिती दिली.

विशेष आकर्षण – “लंडन ब्रिज”

लांबी: १८० फूट

रुंदी: १५ फूट

उंची: ४५फूट

विद्युत रोषणाईसह सजवलेले हे आकर्षण बारामतीकरांच्या मनात युरोपची झलक निर्माण करणार आहे.

धमाल मस्ती – सर्व वयोगटांसाठी

यामध्ये लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मनसोक्त राईड्स आहेत:

जयंत फील, कोलंबस, ड्रॅगन ट्रेन, ब्रेक डान्स, मोठा पाळणा

मुलांसाठी: पेडलबोट, जंपिंग, मिनी ट्रेन

खरेदीसाठी: खेळणी, तयार कपडे, क्रीडासामग्री, घरगुती वस्तू, किचन भांडी

पुस्तकप्रेमींसाठी: विशेष सवलतीसह पुस्तकांचे स्टॉल

स्वादिष्ट खाद्यपदार्थांची रेलचेल

सोलापुरी पाणीपुरी, चाट, उटी चिल्ली भजी, मिरची भजी, पॉपकॉर्न, कॉटन कॅन्डी, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स आणि बरंच काही!

“सेल्फी पॉइंट” पण आहेच!

अतुलनीय सजावटीच्या पार्श्वभूमीवर फोटो आणि सेल्फी घेण्याचा आनंद वेगळाच!

लंडन ब्रिजचा इतिहास – थोडक्यात

लंडन ब्रिज ही टेम्स नदीवरील ऐतिहासिक पूल साखळी आहे. सध्याचा पूल १९७३ मध्ये बांधण्यात आला असून तो काँक्रीट आणि स्टीलचा आहे. याआधीचा पूल १९ व्या शतकात दगडाचा तर त्याआधीचा मध्ययुगीन पुल तब्बल ६०० वर्ष वापरात होता. पहिला पूल रोमन काळात लंडिनियमचे संस्थापक यांनी बांधला होता.

युरोप – एका नजरांत
सर्वात मोठा देश: रशिया
सर्वात लहान देश: व्हॅटिकन सिटी
उरल पर्वतरांगा, कॉकासस, कास्पियन समुद्र – युरोप आणि आशियामधील सीमारेषा

क्षेत्रफळानुसार युरोप जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान खंड, तर लोकसंख्येच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकावर आहे.

बारामतीकरांनो, युरोप पाहण्यासाठी आता व्हिसा लागत नाही – मिशन हायस्कूल मैदानावर भेट द्या आणि अनुभव घ्या युरोपची सफर, तीही आपल्या गावात!
संयोजकांनी बारामतीवासीयांना आग्रहाचे आमंत्रण दिले आहे – “ही संधी चुकवू नका!”

वेळ: दररोज सायंकाळी ५ ते ९
ठिकाण: मिशन हायस्कूल मैदान, बारामती

बारामतीत ‘लंडन ब्रिज’ पाहण्याची ही पहिलीच आणि कदाचित एकमेव संधी असेल!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here