Homeबातम्याबारामतीत मिरवणूकमध्ये डी .जे .चा वापर करू नये ! पारंपारिक वाद्याचा समावेश...

बारामतीत मिरवणूकमध्ये डी .जे .चा वापर करू नये ! पारंपारिक वाद्याचा समावेश करावा अशी पोलिसांकडे महिलांची मागणी..!!

प्रतिनिधी ; मिरवणूकमध्ये डी .जे .चा वापर करू नये: महिलांची मागणी

महापुरुषांच्या जयंती वेळी शहरातून काढत असलेल्या मिरवणुकीत डी. जे. चा वापर करू नये त्या ऐवजी पारंपारिक वाद्य यांचा वापर करावा अशी मागणी बारामती शहर व तालुक्यातील सर्व महिलांनी केली आहे.


मंगळवार दि.२७ फेब्रुवारी रोजी बारामती शहर पोलीस स्टेशन ला सदर निवेदन देण्यात आले या प्रसंगी सर्व समाज्यातील शहर व तालुक्यातील सर्व महिला उपस्तीत होत्या.
महापुरुषांचे विचार डोक्यावर घेऊन नाचायचे नाही तर डोक्यात घेऊन त्याचे आचरण करणे गरजेचे आहे.
डी. जे. लावून व मद्यपान करून अश्लील व विभत्स डान्स करू नये व पाश्चिमात्य संस्कृती चे अनुकरण होऊ नये व ध्वनी प्रदूषण सुद्धा होऊ नये त्याच प्रमाणे मिरवणूक परिसरात ध्वनी प्रदूषण होऊन लहान बालके व गर्भवती महिला यांना त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येक तरुण मंडळ, संस्था, संघटना ,समाज बांधव यांनी घ्यावी
तर डी. जे. ऐवजी बँड पथक किंवा इतर वाद्ये वाजवावीत जेणेकरून शिस्तबद्ध व आदर्शवत मिरवणूक, ध्वनी प्रदूषण मुक्त मिरवणूक व्याहवी व जिवंत देखावे आणि समाज उपयोगी व्याख्याने घ्यावेत या साठी सर्वांनी पुढाकार घ्यावा व त्याचे आचरण करावे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महापुरुषाच्या जयंती निमित्त डि. जे. वाजवू नये सर्व समाजातील महिलांनी एकत्र येऊन पोलिस स्टेशन येथे निवेदन दिले

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on