बारामतीत उद्या ‘इतिहासाचा दिवस’; सुनेत्रा पवारांच्या विजयाची जोरदार चर्चा…

0
13

बारामतीत उद्या ‘इतिहासाचा दिवस’; सुनेत्रा पवारांच्या विजयाची जोरदार चर्चा…

बारामती : उद्या होणारी पोटनिवडणुकीची मतमोजणी ही केवळ निकालाची औपचारिकता ठरणार का? सध्या बारामतीत याच चर्चेला उधाण आले आहे. “एकच वादा… अजित दादा!” या घोषणेने भारलेले वातावरण उद्याच्या निकालाकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत आहे.
ही निवडणूक फक्त राजकीय लढत नाही, तर भावना, नातं आणि विश्वास यांची कसोटी मानली जात आहे. बारामतीच्या जनतेने अनेक वर्षे ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्या अजित दादांच्या कार्याचा वारसा आता पुढे नेण्याची जबाबदारी सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या खांद्यावर असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते.
स्थानिकांमध्ये असा सूर आहे की, उद्या सकाळ ही साधी नसेल. ती घेऊन येईल आठवणींचा ओलावा, भावनांचा उधाण आणि विश्वासाचा नवा अध्याय. मतमोजणीमध्ये फक्त आकडे मोजले जाणार नाहीत, तर जनतेच्या मनातील प्रेम आणि नातेसंबंधही स्पष्ट होणार आहेत.
बारामतीत सर्वत्र एकच चर्चा ऐकू येते — “हा फक्त निकाल नाही, हा इतिहास असेल!”
मोठ्या मताधिक्याने सुनेत्रा पवार विजय मिळवतील, असा ठाम विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
उद्या बारामतीत फक्त विजयी उमेदवार जाहीर होणार नाही…
तर बारामतीच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे!

Previous article“बारामतीचा श्वास – अजितदादा”
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here