बारामतीतील चित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन — उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन…!
बारामती (प्रतिनिधी) — नटराज नाट्य कला मंडळ आणि बारामती कलाकार कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बारामतीमधील कलाशिक्षक चित्रकारांच्या चित्रकलाकृतींचे प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते रविवारी, दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे. हा कार्यक्रम नटराज कला दालन, बारामती येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
