कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित ट्रायथलॉन आणि ड्युलथॉन स्पर्धेत बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनची सदस्या कु.वैष्णवी सतिश ननवरे अव्वल
ता.१० सप्टेंबर (प्रतिनिधी) : कोल्हापूर येथे झालेल्या कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब द्वारे आयोजित ट्रायथलॉन आणि ड्युलथॉन स्पर्धेत बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनची सदस्या कु.वैष्णवी सतिश ननवरे ट्रायथलॉन स्पर्धेत ७ तास १० मिनिटे ही विक्रमी वेळ नोंदवून महिलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
या स्पर्धेची विजेती म्हणून येत्या ८ ऑक्टोबर २०२३ रोजी गोवा येथे हाल्फ आयर्नमॅन स्पर्धेची नावनोंदणी वैष्णवीला मोफत प्राप्त झाली आहे.
वैष्णवी सोबतच बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सदस्य तथा इंडियन फॉरेस्ट ऑफीसर तुषार चव्हाण यांनी ट्रायथलॉन पूर्ण केली.
बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष व प्रशिक्षक आयर्नमॅन सतिश ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांनी सराव करून हे यश प्राप्त केले आहे.
यापूर्वी देखील वैष्णवी आणि तुषार चव्हाण कझकिस्थान येथे झालेल्या फुल्ल आयर्न मॅन स्पर्धेत आयर्न मॅन किताब प्राप्त केला आहे. तर वैष्णवी ही या स्पर्धेची १८ ते २४ या वयोगटातील विजेती होती.