प्रामाणिकतेचा आदर्श: सचिन गवारे माऊली यांचा प्रामाणिकपणा पोस्ट ऑफिसने केला गौरवाने सत्कार

0
52

प्रामाणिकतेचा आदर्श: सचिन गवारे माऊली यांचा प्रामाणिकपणा पोस्ट ऑफिसने केला गौरवाने सत्कार

बारामती |
वारकरी संप्रदायाची शिकवण म्हणजे माणुसकीचा खरा प्रकाश. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा हा जीवंत प्रत्यय पुन्हा एकदा बारामतीत अनुभवास आला.

वारकरी सेवा संघाचे बारामती शहर अध्यक्ष श्री. सचिन हरिदास गवारे माऊली, जे शहरातील विविध मंदिरे, संस्था व धार्मिक कार्यात सक्रिय सेवा देतात, यांनी आपल्या प्रामाणिकतेचा आदर्श समोर ठेवला. अलीकडेच बारामती पोस्ट ऑफिसकडून त्यांना चुकून रोख स्वरूपात अधिकची रक्कम देण्यात आली. ही बाब लक्षात येताच त्यांनी कुठलाही विलंब न करता स्वतः पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ती रक्कम परत केली.

त्यांच्या या प्रामाणिकतेचे कौतुक करत बारामती पोस्ट ऑफिस आणि श्री. धनंजय घोगरे साहेब यांनी त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला व समाजासमोर एक आदर्श निर्माण केल्याबद्दल आभार मानले.

सचिन गवारे माऊली यांनी या संपूर्ण कृतीचे श्रेय वारकरी सेवा संघ, गुरुवर्य बंडा तात्या कराडकर, आदरणीय भिडे गुरुजी, कन्हेरी व सिद्धेश्वर देवस्थान, स्वामी माधवनाथ ध्यान केंद्र, तसेच आई-वडील, आजोबा, मामा आणि संप्रदायाच्या संस्कारांना दिले.

या घटनेतून हेच सिद्ध होते की वारकरी परंपरेचे संस्कार हे आजही समाजात प्रामाणिकपणाचा दीप तेवते ठेवत आहेत. अशा कार्यकर्त्यांमुळेच समाजात विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा यांचा अजूनही कायमचा ठसा उमटतो आहे.

जय हरी!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here