बारामती प्रतिनिधी : प्रवीण (भैय्या) माने , “बारामती युवा प्रतिष्ठान चा यंदाही जोरदार गणेशोत्सव सोहळा साजरा केला जाणार’…!
बारामती प्रतिनिधी: प्रवीण भैय्या दत्तात्रय माने यांच्या वतीने अनंत युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून यावर्षीही जोरदार गणेशोत्सवाचा सोहळ्याचे एमआयडीसीतील सूर्यनगरी येथे आयोजन करण्यात येते . बारा वर्षापासून सुरू असलेल्या मोठ्या श्रद्धेने भक्तिमय वातावरणात उत्सवाची सालाबाद प्रमाणे अनंत युवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून याही वर्षी गणेशोत्सव जोरदार रित्या तयारी करण्यात आलेली आहे. “अनंत युवा प्रतिष्ठान’ आयोजित गणेश फेस्टिवल दरवर्षीप्रमाणेच मोठ्या उत्साहात जल्लोषात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून या सूर्यनगरी एमआयडीसी भागातील नागरिक, गणेशभक्त कर्मवणुकीच्या माध्यमातून मेजवानी घेत असतो. सालाबाद प्रमाणे याही वर्षी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रवीण भैया दत्तात्रय माने संस्थापक अध्यक्ष यांनी भावनगरी शी बोलताना सांगितलेले आहे. खालील कार्यक्रम सादर होणार आहे….
मंगळवार दि.19 रोजी सायंकाळी 6.00 वा.
श्रींची स्थापना .
बुधवार दि.20 रोजी सायंकाळी 5.00 वा.
ह. भ. प. श्री. निवृत्ती महाराज देशमुख ( इंदोरेकर) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
बुधवार दि. 20 रोजी रात्री 7.00 वा.
डॉ.वसंत हंकारे युवा प्रबोधनकार यांचे व्याख्यान व्याख्यानाचा
विषय : चला जगूया आनंदाने
गुरुवार दि.21 रोजी रात्री 7.00 वा.
श्री. योगेश चीटगावकर व सहकलाकार
भारत सरकारच्या युवा प्रतिभा पुरस्कार विजेते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अष्टपैलू लोककलाकार.
शुक्रवार दि. 22 रोजी सुर नवा ध्यास नवा उपविजेत्या सौ राधा खुळे- तरटे यांचा मराठी व लोकगीतांचा कार्यक्रम.
शनिवार दिनांक 23 रोजी श्री शरद तांदळे सुप्रसिद्ध उद्योजक युवा व्याख्याते लेखक आंत्रप्रन्योर, रावण यांचे व्याख्यान दिनांक 24 रविवार रोजी डान्स स्पर्धा वयोगट तीन ते 17- 11 ते 15 -16 ते 25 विजेत्या स्पर्धकास आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत नोंदणी 73 78 80 33 22/ 97 63 81 1242/ 9850150096
सोमवार दिनांक 25 रोजी सकाळी 11 वाजता- कुंकू मार्चण कार्यक्रम -(महिलांसाठी सामुदायिक पूजा सोहळा कुंकू मार्चण यांचे महत्त्व घरामध्ये लक्ष्मीचे वास्तव्य टिकून राहावे यासाठी केले जाणारे लक्ष्मीची पूजा -नाव नोंदणी संपर्क 97 63 81 12 42 /98 50 15 00 96
सोमवार दिनांक 25 रोजी होम मिनिस्टर प्रथम विजेते पैठणी दुतीय विजेते सोन्याची नथ तृतीय विजेते एक ग्रॅम सेट नाव नोंदणीसाठी संपर्क 97 63 81 12 42 98 50 15 00 96 होम मिनिस्टर साठी भाग घेणाऱ्या प्रत्येक महिलेस मुक्ताई टेक्स्टाईल तर्फे आकर्षक भेटवस्तू
मंगळवार दिनांक 26 रोजी श्री गणेश अर्थ शीर्ष पठण महिलांसाठी मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्री गणेशाची केली जाणारी पूजा नाव नोंदणी संपर्क 97 63 81 12 42 /98 50 15 0096
मंगळवार दिनांक 26 रोजी
हास्य सम्राट फेम -टीव्ही कलाकार
अजितकुमार कोष्टी
बुधवार दिनांक 27 रोजी सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद गुरुवार दिनांक 28 रोजी श्री च्या मूर्तीची भव्य विसर्जन मिरवणूक तर गणेश फेस्टिवल मध्ये दररोज उपस्थित राहणाऱ्या भाग्यवान तीन महिलांना आकर्षक भेटवस्तू बक्षीस मिळणार असणार आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण भैय्या माने यांनी दिले तर कार्यक्रमांना उपस्थित सर्वांनी राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी मनोरंजनाचा लाभ घ्यावा अशी विनंती अनंत युवा प्रतिष्ठान चे प्रवीण भैय्या माने यांच्या मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे . ठिकाण अनंत युवा प्रतिष्ठान आयोजित गणेश फेस्टिवल 2023 ठिकाण ओपन पेस सूर्यनगरी जळोची बारामती