
पुन्हा एकदा विक्रमी रक्तदानाकडे वाटचाल…!
अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन!
बारामती, दि. २५ जुलै २०२५ (शुक्रवार) —
राज्याचे लाडके आणि जनतेच्या मनामनातील उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही एक सामाजिक भव्य उपक्रम — रक्तदान शिबिर — आयोजित करण्यात आले आहे. अजितदादा युथ फाउंडेशन, बारामती यांच्या वतीने आयोजित हे शिबिर रिक्रिएशन हॉल, MIDC, बारामती येथे संपन्न होणार आहे.


या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत मा. श्री. हसन मुश्रीफ साहेब — वैद्यकीय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य.
कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत सौ. रूपालीताई चाकणकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महिला आयोग.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. ज्ञानेश्वरमाऊली आबा कटके — आमदार, शिरूर हवेली मतदारसंघ,
आणि सौ. निर्मिलाताई शुभम नवले — सरपंच, कारेगाव व युवती कार्याध्यक्ष — यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

या समाजोपयोगी उपक्रमात शहर व परिसरातील युवक, महिला, कार्यकर्ते आणि दादा प्रेमी उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत.
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान!” या भावनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही हे रक्तदान शिबिर विक्रमी ठरणार याची खात्री आहे.
“चला तर मग, नक्की यायचं…!
हे केवळ आमचं नव्हे, आपलंही आहे…!” असे आवाहन आयोजक अजितदादा युथ फाउंडेशन, बारामती रक्तदानाचे पवित्र योगदान देऊन सहकार्य करावे अशी विनंती अजितदादा युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ ( आप्पा) गायकवाड व मित्र परिवारांच्या वतीने करणात आले आहे .