देशाच्या राजकारणातील ‘गॉडफादर”…!
आजवरच्या राजकीय जिवन पटलावर निष्कलंक व्यक्तिमत्व शरद पवारसाहेब
महाराष्ट्राच्या मातीत आजवर अनेक राजकीय कर्तुत्वान नेतृत्व जन्मास आली आहेत. पुर्वीपासून अनेकांनी महाराष्ट्राचा आवाज दिल्ली दरबारी पोहोचवत महाराष्ट्र्राज्याचं विकासाचं रुपडं बदलवलं. यापैकीच एक म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकीय परिघामध्ये आपल्या नावाचं वर्चस्व निर्माण करणारे बारामती नगरीचे भाग्यविधाते व राजकीय आखाड्यातील अभ्यासू, सुसंस्कृत आणि विशेष म्हणजे निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचं नाव सर्वश्रुत आहे असे आदरणीय माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब देशाच्या राजकारणातील ‘गॉडफादरच्या”भूमिकेत ते सध्या दिसून येतात
होय. आई शारदाबाई वडील गोविंदराव पवार यांच्या छत्रछायेत तर पूढे यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय वारसा चालवण्याच्या हेतूने सक्षम मार्गक्रमण करताना राजकारणापेक्षा समाजकारण करून सर्वतोपरी जनतेच्या विकासाचा ध्यास मनी ध्यानी ठेवत आहोरात्र कष्टांची परिसीमा ओलांडणारे शरद पवार साहेब यांना नेहमीच बारामतीच्या जनतेने आपल्या हृदयात महत्त्वपूर्ण स्थान दिले. आयुष्याच्या वळणावर अनेक चढ उतार पवार साहेबांनी पहिले तर अनेकदा जय झाले पराजयांना त्यांना कधीही सामोरे जावे लागले नाही . पण पवार साहेबांनी कधीही आपल्या मुळस्वभावातील सुसंस्कृतपणा सोडला नाही. एक चतुर, अभ्यासू आणि परखड वक्ता म्हणून व राष्ट्रीय राजकारणात प्रत्येकाला ते अवगत तर जगात देखील त्यांनी आपल्या नावाची ओळख निर्माण करून आहेत. बारामतीच्या राजकारणापासून किंबहुना महाराष्ट्रासह देशाच्याच्या राजकीय पटलावर विविध पक्षात पवारसाहेबांच्या बद्दल त्यांचा आजवर आदरयुक्त दरारा कायम ठेवला गेला आहे.
महाराष्ट्रच्या राजकारणात अनेक उलथपालथ झाले विविध पक्षांची एकत्रीकरण करून सरकार स्थापन झाले त्याही राजकारणात ‘गॉडफादरच्या” भूमिकेतून शरद पवार साहेबच दिसून आले ..! आज अनेक नेतेमंडळी कधी इकडे तर कधी तिकडे पक्षप्रवेश करताना दिसून येतात मात्र बारकाईने जर अभ्यासले तर निश्चित लक्षात येईल की, महाराष्ट्रात मधील अनेक नेते पुढारी ही शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घडलेली आहे,’ तर अनेक मोठमोठ्या नेत्यांना, पुढार्यांना वेळोवेळी शरद पवारच्या मार्गदर्शनाची गरज भासल्याचे दिसून आलेले आहे. पुढील किमान पन्नासवर्षांचे धोरणात्मक विचारधारा , मोठयात मोठी विचारश्रेणी हीच खरी शरद पवार साहेबांची ओळख आहे. सत्ता असताना कुठल्याही अविर्भावात न राहणारे
पवारसाहेब सत्ता नसल्यानंतरही त्याच पोट तिडकीने दिनदुबळ्यांच्या मदतीला धावून जाताना दिसून येतात. महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, वैद्यकीय एकंदरीत सर्वच क्षेत्रात पवारसाहेब आपले योगदान देत आलेले आहेत म्हणूनच ते सर्वराजकरण्याचे .’गॉडफादर”
आहेत असे म्हंटले तर वावगे ठरू नये.
प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीचं कौतुक आणि सन्मान देखील शरद पवारांनी प्रत्येक वेळोवेळी केलेला आहे. कित्येकदा शरद पवार यांनी वडिलकीच्या आणि आपुलकीच्या मायेच्या दोन शब्दाने आणि प्रेम मायेने अनेकांना कुरवळताना साहेबाना प्रत्येकाने पाहिलेले आहे. सबंध महाराष्ट्राचा विकास हीच आमची जात आणि धर्म समजून राजकारणात कार्य करणारे पवारसाहेब हे स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच् सर्वधर्मसमभाव एक पक्ष असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. कारण महाराष्ट्राच्या जनतेने कधीच आजवर हे पाहिले नाही की शरद पवारसाहेब हे कुठल्या पक्षांचे नेतृंव करताहेत आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने केवळ एकच पाहिले आहे की, आपल्याला मतदान है। पक्षाला नव्हे तर केवळ शरद पवारसाहेब यांनाच द्यायचे आहे म्हणूनच तर पवार साहेब कालपर्यंत चार वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षण गृहमंत्री, कृषिमंत्री देशाचे बीसीसीआय आयसीसी क्रिकेट बोर्ड चे अध्यक्ष म्हणून कार्य केले अशा विविध
पदावर विराजमान झाले आहेत. राजकीय नेत्यांप्रमाणे कधीही फुकट डौलाने न वावरणारे पवार साहेब आजपर्यंत त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकास एक कुटुंबवत्सल असल्याची जाणीव होते. गोरगरीब शेतकऱ्यांपासून दिनदयाळू पासून मग ते अंबानी असो टाटा असो किंवा बजाज महिंद्रा , सायरनपुना वाला तसे यांचे ते आजवर मसिहा ठरलेले आहेत.
पुत्तने अजितदादा पवार कन्या सुप्रियाताई सुळे याचबरोबर संपूर्ण पवार कुटुंबीय यांना देखील आपल्याप्रमाणे राजकीय प्रवाहात आणून विविध संस्थांवर आमदार खासदार करत ते विराजमान करण्यात शरद पवार ही मोठी भूमिका घेत आलेले आहे तर काल आणि आता बारामतीच्या शहरांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात पुतणे अजितदादा पवार या नावाला मोठं वलय प्राप्त झाले आहे तर बारामतीकर आता अजितदादा यांच्याकडे शरद पवारसाहेब चे उत्तराधिकारी म्हणून मोठा अपेक्षेने पाहू लागले आहेत, याचे कारण म्हणजे आजपर्यंत शांत, संयमी असणाऱ्या पवार साहेबांनी सकारात्मक दृष्टीक्षेपातून ज्या पद्धतीने महाराष्ट्रातसह विकासगंगा बारामतीनगरीमध्ये आणली आणि समाजकारणाला महत्त्व देऊन सातत्याने सर्वसामान्य जनतेचे हित पाहिले आणि आज पर्यंत स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर कधीही कुठलाही आणि किंचितही कलंक लागून दिला नाही अशाच पद्धतीने विकासात्मक भूमिकेतून सडेतोड राजकिय व महाराष्ट्र राज्यातील जनतेला उपुख्यमंत्रीपदाच्या माध्यमातून अजितदादा पवार यांचे व्यक्तिमत्व सध्या दिसून येते.
अजितदादा व खासदार सुप्रियाताई याच्या नेतृत्वाची वाटचाल पूर्णतः पवारसाहेबांनप्रमाणेच होऊ लागली आहे. एवढेच नाहीतर आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकीय नेतृत्वाची धुरा चार वेळा उपुख्यमंत्री पदावर संपूर्ण देशाच्या राजकारणात सक्षम नेतृत्व सिद्ध अजितदादा यांच्यावर सोपवण्यासाठी आद.पवारसाहेब पूर्ण तयारीला लागले असून पवारसाहेबांच्या मार्गदर्शन शिकवणीखाली तयार झालेले अजितदादा भविष्यात शरद पवार साहेबाचे अपडेट व्हर्जन ठरतील यात तिळमात्र शंखा नाही.
संपादक भावनगरी
संतोष शिंदे