
दणका! माळेगाव साखर कारखान्यात रणधुमाळी – श्री निळकंठेश्वर पॅनलचा दमदार…
प्रवेश….!
आज पर्यंत एकूण ९० अर्ज दाखल, पणदरे गट आघाडीवर!!
बारामती, (प्रतिनिधी):
बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेचा आणि हजारो शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षांचं प्रतीक असलेल्या दि. माळेगाव सहकारी साखर कारखाना लि. च्या पंचवार्षिक निवडणुकीला रणकठीण सुरुवात झाली असून, ‘श्री निळकंठेश्वर पॅनल’ने दमदार शक्तिप्रदर्शन करत निवडणुकीच्या मैदानात जोरदार एंट्री घेतली आहे. अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखालील या पॅनलला सर्वपक्षीय पाठिंबा लाभला असून, पारदर्शक कारभार आणि विकासाचा निर्धार या घोषणा घेऊन ते विजयी रणसंग्रामात उतरले आहेत.
विजयाचा मंत्र – “पारदर्शक कारभार, मजबूत नेतृत्व!”
श्री निळकंठेश्वर पॅनलच्या पत्रकार परिषदेत बारामती राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे, विद्यमान चेअरमन केशवराव (बापू) जगताप, पीडीसी बँकेचे संचालक संभाजी (नाना) होळकर, आणि खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष रवींद्र माने उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना न्याय, कामगारांना हक्क, आणि कारखान्याच्या आर्थिक सुदृढतेचा निर्धार सादर करण्यात आला.
राजवर्धन शिंदे म्हणाले,

“ही फक्त निवडणूक नाही – ही माळेगावच्या भविष्याची शिल्परचना आहे! अजितदादांचे नेतृत्व म्हणजे विकासाची खात्री.”
अर्जवर्षाव! तब्बल ९० अर्ज दाखल – पणदरे गटाने बाजी मारली १२ जून रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि एकूण ९० अर्ज दाखल झाले. गटवार आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
गट अर्जांची संख्या
पणदरे 15
सांगवी 14
माळेगाव 12
खांडज-शिरवली 9
महिला राखीव 9
बारामती 7
निरावागज 7
भटक्या जमाती 6
अनुसूचित जाती/जमाती 5
इतर मागास प्रवर्ग 4
बिगर उत्पादक संस्था 2
पणदरे, सांगवी आणि माळेगाव हे प्रमुख रणांगण ठरले असून, इच्छुकांची गर्दी, गटबाजी, आणि राजकीय गोटातील हालचालींनी रंगत वाढवली आहे. नीलकंठेश्वर पॅनल चे उमेदवारांची यादी – विकासाचे चेहरे मैदानात माळेगाव: बाळासाहेब तावरे, रंजीत जाधवराव, राजेंद्र बुरुंगले
पणदरे: तानाजी कोकरे, स्वप्निल जगताप, योगेश जगताप


सांगवी: विजय तावरे, विजेंद्र तावरे, गणपत तावरे
खांडज-शिरवली: प्रताप आटोळे, सतीश फाळके
निरावागज: जयपाल देवकाते अविनाश देवकाते
बारामती: नितीन सातव, देविदास गावडे
विशेष प्रवर्गात:
अनुसूचित जाती – रतनकुमार भोसले महिला राखीव – संगीता कोकरे, ज्योती मुलमुले
इतर मागास – नितीन शेंडे
भटक्या-विमुक्त – विलास देवकाते
बिगर उत्पादक संस्था – अजित अनंतराव पवार
मतदानाची रणनिती – तिथी निश्चितअर्ज छाननी: २८ मे
मागे घेण्याची मुदत: २९ मे ते १२ जून अंतिम यादी: १३ जून
मतदान: २२ जून
मतमोजणी व निकाल: २४ जून
कारखान्याचे भवितव्य शेतकऱ्यांच्या हाती!
या निवडणुकीकडे बारामती तालुक्याचे संपूर्ण लक्ष लागले आहे. जुने दिग्गज पुन्हा मैदानात उतरणार की नव्या दमाचे नेतृत्व पुढे येणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. अजितदादांचे मार्गदर्शन, निळकंठेश्वर पॅनलची तयारी, आणि शेतकऱ्यांचा विश्वास – हीच विजयी त्रिसूत्री!
घोषणा घुमतेय…

“विकासाचे नेतृत्व – अजितदादा पवार!
पारदर्शक कारभार – निळकंठेश्वर पॅनल!”
भविष्यातील भरारीसाठी माळेगाव सज्ज आहे – आणि श्री निळकंठेश्वर पॅनल विजयी होणार असे निश्चित समजले जाते परंतू जर तर ची निवडणूक आहे पाहू काय होते ते… तुर्तास बोलाचा भात आणि बोलाचीच कडी…!