Homeबातम्याडिजिटल कॉपीराईटचे गुन्हे आणि सायबर सुरक्षामालवेअर'च्या प्रसाराचे पायरसी वेबसाइट्स मोठे माध्यम .....

डिजिटल कॉपीराईटचे गुन्हे आणि सायबर सुरक्षामालवेअर’च्या प्रसाराचे पायरसी वेबसाइट्स मोठे माध्यम …..

डिजिटल कॉपीराईटचे गुन्हे आणि सायबर सुरक्षा

जागरुकतेला प्राधान्य देण्याची गरज…..

‘मालवेअर’च्या प्रसाराचे पायरसी वेबसाइट्स मोठे माध्यम

                                                                       - ब्रिजेश सिंह

आयएसबी इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्सेसचा सायबर सुरक्षेबाबतचा अहवालाचे प्रकाशन

        मुंबई, दि. २१ : पायरसी वेबसाइट्स मालवेअरचा प्रसार करण्यासाठी मोठे मध्यम बनले आहेत. ग्राहक केवळ पायरेटेड मुव्ही किंवा टीव्ही शो पाहत नसून ते त्यांच्या 'डिव्हाइस'शी तडजोड करत आहेत आणि तुमचे ' डिव्हाईस' ‘दुसरे तुम्हीच’ आहात. त्यात तुमची ओळख, तुमचे बँकिंग तपशील, तुमचे मित्र आणि कुटुंबीयांचे तपशील असतो. अनेक वर्षांपासून ज्या गोष्टी संदिग्ध होत्या, त्यांचा आता या अहवालात खुलासा करण्यात आला आहे. आयएसबी (इंडियन स्कूल ऑफ बिझिनेस) चा अहवाल या बदलाची सुरुवात आहे, असे मत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले. 




        आयएसबी (इंडियन स्कूल ऑफ बिझनेस) द्वारे सायबर सुरक्षेबाबत सर्वंकष अभ्यास करण्यात आला. या अभ्यासावरील अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, दक्षिण आशियाचे अमेरिकी बौद्धिक संपदा सल्लागार जॉन कॅबेका, प्रादेशिक संचालन प्रमुख नील गणे आणि आयएसबी ' 'इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्स’चे प्रा. मनीष गंगवार आदी मान्यवरांच्या हस्ते वाणिज्य दूतावास, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.  

        यावेळी कार्यकारी संचालक मनीष गंगवार,  ला ट्रोब युनिव्हर्सिटी (मेलबर्न) येथील सायबर सुरक्षा विभागाचे सहायक प्रा. डॉ. पॉल वॉटर्स,  कॅरिन टेंपल यांनीही आपली मते मांडली.




   ‘आयएसबी इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्स’ चे प्रा. गंगवार आणि डॉ. श्रुती मंत्री,  मेलबोर्नच्या 'ला ट्रोब युनिव्हर्सिटी' येथील सायबर सिक्युरिटीचे सहायक प्राध्यापक डॉ. पॉल वॉटर्स यांनी 'दि पायरसी- मालवेअर नेक्सस इन इंडिया : अ परसेप्शन आणि अनुभव आणि अनुभवजन्य विश्लेषण'  या कार्यक्रमाचे आयोजन वाणिज्य दूतावास, मुंबई येथे अलायन्स फॉर क्रिएटिव्हिटी अॅण्ड एन्टरटेन्मेट (एसीई), आयएसबी  इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्स (आयआयडीएस ) आणि एसीई यांनी युनायटेड स्टेट्स पेटंट अॅण्ड ट्रेडमार्क ऑफिस (यूएसपीटीओ) च्या सहकार्याने आयोजित करण्यात आला.

अहवालातील निष्कर्ष

        अहवालात प्रौढ उद्योग ५७ टक्के आणि जुगाराशी संबंधित जाहिरातीच्या ५३ टक्के तुलनेत पायरसी साइट्समध्ये प्रवेश केल्याने मालवेअर संसर्गाचा ५९ टक्के जास्त धोका उद्भवतो. ‘वायरस टोटल’ चा उपयोग करून १५० वेबसाइट्सच्या विश्लेषणात मालवेअर, संशयास्पद क्रियाकलाप, फिशिंगचे प्रयत्न आणि स्पॅम यासारख्या सायबर जोखीम असल्याचे समोर आले.  मानक पायरसी संकेतस्थळांच्या तुलनेत “स्कॅम पायरसी संकेतस्थळ” उपयोग कर्त्यांना सायबर धोक्यांना समोर आणण्याचा धोका जास्त असतो. 

    मालवेअर वितरण पायरसी साइट संचालकांसाठी अतिरिक्त महसूल उत्पन्न करण्यासाठी भारतात ऑनलाइन पायरसी फायदेशीर राहिली आहे. भारतीय ग्राहक पायरसी साइट्सचा उपयोग करतांना त्यांच्या खऱ्या सायबर जोखमीला कमी लेखतात, पायरसी संकेतस्थळाशी संबंधित सायबर सुरक्षा धोक्यांकडे लक्ष देण्याची तातडीची गरज आहे यावर भर देतात. इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या (आयएसबी ) सायबर सुरक्षा तज्ञांनी केलेल्या तळागाळातील धारणा आणि अनुभव अध्ययनात (ग्राऊंड पर्सेप्शन ॲण्ड             एक्सपिरिअन्स स्टडी) मालवेअर संसर्गाचा भारतीय ग्राहकांसाठी ५९ टक्के जोखीम असलेल्या पायरसी वेबसाइट्स एक प्रमुख धोका असल्याचे समोर आले आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे १८-२४ वर्षे वयोगटातील उपयोगकर्ते जे या प्लॅटफॉर्मवर जास्त व्यस्त असतात त्यांच्यात सायबर धोक्यांबाबत कमी जागरूकता असल्याचे दिसून आले. 

        हे सर्वेक्षण हे २३ ते २९ मे २०२३ या कालावधीत करण्यात आले. ‘YouGov’ नॅशनल ऑम्निबसचा भाग म्हणून भारतातील १०३७ उत्तररदात्यांचा यात समावेश आहे. भारतातील प्रौढ नागरिकांच्या वारंवारतेच्या प्रमाणात लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांवर आधारित १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ऑनलाइन लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करण्यासाठी डेटाचे संतुलन करण्यात आले. 

हा संपूर्ण अहवाल https://www.isb.edu/content/dam/sites/isb/India-Piracy-and-Cyber-Threats-Report-DM.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on