ज्ञानसागर’च्या यशाची शंभरी! — १० वीचा निकाल पुन्हा १०० टक्के!— श्रावणी पवार प्रथम, ३० टक्के विद्यार्थ्यांचे ९०% पेक्षा अधिक गुण!

0
26

‘ज्ञानसागर’च्या यशाची शंभरी! — १० वीचा निकाल पुन्हा १०० टक्के!
— श्रावणी पवार प्रथम, ३० टक्के विद्यार्थ्यांचे ९०% पेक्षा अधिक गुण!

सावळ, ता. बारामती :
सावळ येथील ज्ञानसागर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजने यंदाही आपली यशाची परंपरा कायम ठेवत दहावीचा १०० टक्के निकाल साधला. विशेष म्हणजे विद्यालयातील तब्बल ३० टक्के विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत ‘ज्ञानसागर’चे नाव पुन्हा एकदा उज्ज्वल केलं आहे.

श्रावणी संतोष पवार हिने ९६.०० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तनुजा किशोर घोरपडे हिने ९४.६० टक्क्यांसह द्वितीय तर तनुजा जनार्दन आटोळे व सिद्धी प्रकाश शिंदे यांनी ९३.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.

या यशस्वी विद्यार्थ्यांमुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या कर्तृत्वावर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

अभिनंदन केले …संस्थापक अध्यक्ष डॉ. सागर आटोळे, सचिव मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, पल्लवी सांगळे, दीपक सांगळे, दीपक बिबे, सीईओ विभागप्रमुख संपत जायपत्रे, गोरख वनवे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, तसेच सुधीर सोनवणे, नीलिमा देवकाते, राधा नाळे, नीलम जगताप, सतिश पिसे आदी मान्यवरांनी तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा विद्यार्थ्यांना दिल्या..!

‘ज्ञानसागर’च्या यशाचा हा झरा पुढील वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here