जळोची विविध कार्यकारी सोसायटी निवडणूक बिनविरोध….!
बारामती (प्रतिनिधी): बारामतीतील जळोची विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित, जळोची या प्रतिष्ठित सहकारी संस्थेची निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली. १३ जागांसाठी एकूण ५० अर्ज दाखल झाले होते. त्यातील ३६ अर्ज वैध ठरले, परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यात केवळ १३ उमेदवार रिंगणात राहिल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी अमर गायकवाड यांनी ही अधिकृत घोषणा केली. बिनविरोध निवड झालेल्या कार्यकारिणी सदस्यांची यादी पुढीलप्रमाणे:(सर्वसाधारण गट:)अर्जुन उद्धव पागळे ,अनिल दिनकर आवाळे,रोहिदास दौलत चौधर,महेंद्र शरद सातकर
सुरेश भीमराव विरकर,
राजेंद्र गणपत आटोळे
श्रीरंग नामदेव जमदाडे
महादेव पांडुरंग चौधर
(महिला राखीव:)
सुनीता दत्तात्रेय आवाळे
सारिका महादेव वीरकर
(अनु.जा./प्रवर्ग:)
कुसुम राधाकृष्ण बगाडे
(इतर मागास प्रवर्ग:)
धनंजय रतन जमदाडे
(भ.ज.वि.ज.वि.मा. प्रवर्ग:)
दीपक गुलाबराव मलगुंडे
या निवडणुकीच्या बिनविरोध पार पडण्यासाठी गावातील अनेक मान्यवरांनी पुढाकार घेतला. दीपक मलगुंडे, प्रतापराव पागळे, दत्तात्रय माने, माणिक मलगुंडे, अतुल बालगुडे, राजेंद्र चोपडे, अभिजीत जाधव, शैलेश बगाडे, अमोल सातकर, महादेव चौधर, विष्णुपंत चौधर, दत्तात्रय आवाळे, संतोष आटोळे, पोपट आवाळे, मनोहर जमदाडे, शेखर सातकर, संतोष सुखदेव जमदाडे, सत्यवान गोफणे यांचे निवडीसाठी योगदान उल्लेखनीय राहिले.
सर्वांनी एकत्र येऊन मतभेद बाजूला ठेवत सहकारभाव जपत ही निवडणूक शांततेत व एकमताने बिनविरोध केली, हे खरंच कौतुकास्पद आहे. जळोची गावाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, एकता आणि सहकार्य हाच खरा विकासाचा मार्ग आहे.

