चहाची “तलप” ☕
संतोष शिंदे

बारामतीतील नक्षत्र गार्डन मित्र मंडळ- सकाळ झाली की एक वेगळीच लगबग पाहायला मिळते. फिरायला येणारे नागरिक, मित्रमंडळींच्या गप्पा, हास्यविनोद आणि त्या सगळ्याला जोडणारा एक खास धागा म्हणजे — चहाची “तलप”!
नक्षत्र गार्डनमध्ये रोज न चुकता जमणाऱ्या या मंडळींसाठी चहा म्हणजे केवळ पेय नाही, तर मैत्रीचा, दिवसाच्या सकाळच्या सुरुवातीचा आनंदाचा क्षण आणि दिवसाचा थकवा घालवणारा खास क्षण आहे. आणि या चहाची खरी ओळख बनली आहे मूळ पुणे येथील परंतु बारामतीच्या एमआयडीसीतील विद्यानगरीचे सुप्रसिद्ध धीरज झगडे “तलप”चव निराळी” परंपरेची चव जपणारे झगडे यांच्या शाखा क्रमांक २ मधील खास चहा. “तलप”
“एक कप चहा झाला की दिवसाची सुरुवात झाल्यासारखं वाटतं,” असे अनेक जण हसत सांगतात. कडक चवदार चहा मन मोहून टाकणारा, योग्य प्रमाणातील गोडवा आणि चवीतील सातत्य यामुळे या चहाने अनेकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले आहे.
दररोजच्या भेटीत बारामतीसह महाराष्ट्राच्या राजकारणापासून दिल्लीपर्यंत ते देश विदेशापर्यंत, क्रिकेटपर्यंत, गावच्या घडामोडींपासून जुन्या आठवणींपर्यंत अनेक विषय रंगतात. पण प्रत्येक चर्चेची सुरुवात आणि शेवट मात्र एका वाक्यानेच होतो — “चल, आधी चहा घेऊया!”
आजच्या धावपळीच्या जीवनात अशी ठिकाणे आणि अशी माणसे समाजातील आपुलकी जिवंत ठेवतात. नक्षत्र गार्डनमधील ही मैफल आणि त्या चहाची “तलप” म्हणजे बारामतीच्या नक्षत्र ग्रुप जिव्हाळ्याचे सुंदर उदाहरणच म्हणावे लागेल…,!




