Homeभावनगरी डायरीचला करू भ्रमंती…

चला करू भ्रमंती…

चला करू भ्रमंती…

कोरोना कालावधीत पर्यटनावर बंदी होती. आता कोरोना संपल्यानंतर प्रत्येकाला कुठे ना कुठे तरी पर्यटनाला जाण्याची इच्छा आणि उत्साह आहे. हीच बाब लक्षात घेऊन पर्यटन विभागाद्वारे पर्यटकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. थंडीच्या दिवसात येणारे महत्त्वाचे दोन सण नाताळ आणि नववर्षानिमित्त प्रत्येकजण आपल्या मित्र आणि नातेवाइकांसोबत वेळ देऊन या क्षणांचा आनंद घेत असतात. काही जण आपल्या जवळच्या पर्यटन ठिकाणांना पसंती देतात. जवळच्या निसर्गाच्या सान्निध्यात, माफक दरात व सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती असते.

सर्वांनाच विदेशात अथवा देशभर भ्रमंती करणे आर्थिक आणि वेळेच्या अभावी शक्य होत नाही. अशा वेळी राज्यात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे आपण सुट्टीचा मनसोक्त आनंद लुटू शकतो. महाराष्ट्रात अशा निसर्गरम्य ठिकाणांची रेलचेल आहे. आज आपण अशा ठिकाणांची माहिती घेणार आहोत, जिये तुम्ही छोट्या सुट्टीमध्ये जाऊन येऊ शकता आणि आपली सुट्टी आनंदात रमणीय ठिकाणी घालवू शकता. महाराष्ट्र शासन पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावरही या ठिकाणांची सर्व माहिती उपलब्ध आहे. तर चला आपण जाणून घेऊ या. राज्यातील महत्त्वाची, पर्यटकाच्या पसंतीस उतरलेल्या ठिकाणांची माहिती.

आंबोली….

सह्याद्रीच्या पर्वतरागांनी वेढलेले सिंधुदूर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण म्हणजे आंबोली होय. गोव्याच्या किनारपट्टीच्या उच्च प्रदेशांपूर्वीचे हे शेवटचे हिरवेगार उतार आणि भव्य दऱ्यांनी वेढलेले ६९० मीटर उंचीवर असलेले हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात जेवढे हे ठिकाण धबधब्यांनी नटलेले दिसते तसेच ते उन्हाळा आणि हिवाळ्यातही अत्यंत थंड असते. त्यामुळे या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणान्या ठिकाणांपैकी एक म्हणजे आंबोली या ठिकाणी वर्षभरात सरासरी ७५० सेंटीमीटर पाऊस पडतो. भरपूर

पावसामुळे आंबोलीत घनदाट जंगल आहे. परिणामी येथे अनेकदा रानडुकरे बिबटे, चितळ आदी वन्य प्राणी आढळतात सहसा न दिसणान्या पशुपक्ष्यांची येथे दर्शन होते, त्यामुळे आंबोली सहती प्राणीप्रेमींसाठी विशेष ठरते. या भागात बड़ा धबधबा, आंबोली ध धबधबा महादेव धबधबा आणि नांगरट धबधबा अशा धबधब्यांची मांदियाळी हिरण्यकेशी नदीच्या उगमस्थानाजवळ एक पुरातन शिवमंदिर आहे. हे मंदिर स्व शंकराने अवतार घेऊन बांधल्याची आख्यायिका आहे. मारुती मंदिर, दुर्ग ढाकोबा कावळेशेत पॉईंट, महादेव गढ़ पॉईंट इत्यादी प्रसिद्ध पर्यटक आकर्ष पाहायला मिळतात.

आंबोलीला भेट देण्याचे आणखीन एक आणि मुख्य कारण म्हणजे येथीत मेजवानी मालवणी झणझणीत कोंबडी वडे, ताने मासे, कोकम सरबत, सोलकढी असे पदार्थ शाकाहारीसाठी सुद्धा फणसाची भाजी घावणे, आंबोळ्या असे पर्याय आहे. जून ते ऑगस्ट हा काळ आंबोलीच्या सहलीसाठी उत्तम मानला जातो. येथे वसतिसा विसलिगं वूड्स, एमटीडीसी ग्रीन व्हॅली प्रसिद्ध व बजेटला परवडणारी निवासस्य आहेत.

आंबोली सावंतवाडी आणि गोव्यापार जवळ असल्यामुळे हवाई, रेल्वे आ रस्त्याने सहज जाता येते. सर्वात विमानतळ गोवा विमानतळ आहे. जे मागनि अंदाजे ७० किलोमीटर अंतरा आहे. रेल्वेने तुम्ही सावंतवाडी स्थानकावर येऊ शकता. पर्यटकांना रेल्वे स्थानकावरून आंबोलीला टॅक्सी घेऊन जाता येते. मुंबई ५५० किलोमीटरआणी पुणे ४०० किलोमीटर अंतरावर असल्याने या दोन शहरांतूनच नव्हे तर शहरांमधूनही असंख्य बसेस उपलब्ध आहेत.

लोणावळा

मुंबई पुणे शहरापासून जवळचे आणि सर्वांच्या पसंतीस उतरलेले ह ठिकाण म्हणजे लोणावळा होय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे ३० मीटर उंचीवर आहे पुण्यापासून१५० किलोमीटर अंतरावर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक, मन प्रसन्न करणारा आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. लोणावळा रेल्वे स्टेशनसाठी अनेक रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत. पुणे स्टेशन ते लोणावळा लोकल रेल्वेसुद्धा उपलब्ध आहे. पुण्याहून दीड तासाचा प्रवास व मुंबईहून साधारणपणे दोन तासांचा प्रवास जवळचे विमानतळ म्हणजे पुणे होय.
लोणावळ्यात टायगर्स लीप, कार्ला लेणी आणि भाजा लेणी, भुशी डॅम, ड्युक्स नोज पवना सरोवर, राजमाची किल्ला, नारायणी धाम मंदिर, सुनील यांचे सेलेब्रिटी वॅक्स म्युझियम, कुणे धबधबा, तुंगाल तलाव, वळवण धरण रायवूड पार्क, कॅनियन व्हॅली. इमॅजिका अॅडलॅब्स या ठिकाणी तुम्ही लोणावळ्यात अनेक प्रकारे भटकंती करू शकता निसर्गप्रेमींसाठी हा खजिनाच आहे. इथे बोटिंग, कॅम्पिंग, साहसी क्रीडाप्रकार आणि ट्रेकिंग मार्गांचे अनेक पर्याय आहेत. भीमा शंकर ट्रेक आणि लोहगड किल्ला ट्रेक आहेत. लोहगड किल्ला हा समुद्रसपाटीपासून १०३३ मीटर उंचीवर असून रात्रीच्या ट्रेकसाठी प्रथम पसंतीचा ठरत आहे.

तुम्ही राजमाची ट्रेकची योजनाही आखू शकता, नवख्या ट्रेकरला राजमाची गावात पोहोचून अर्ध्या तासाचा किल्ल्यापर्यंतचा ट्रेक पूर्ण करता येईल. तर निष्णात ट्रेकर कर्जतकडून सुरू करून ३-४ तासांत शिखरावर पोहोचून ट्रेक पूर्ण करू शकतो. हे शिखर समुद्रसपाटीपासून सुमारे २,००० फूट उंचीवर आहे.

खंडाळा

“ज्वेल ऑफ सह्याद्री’ म्हणजेच लोणावळा तिथून फक्त ३ किमी अंतरावर स्थित खंडाळा ही दोन थंड हवेची ठिकाणे कित्येक दशकांपासून पर्यटकांना आकर्षित करत आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेलगत समुद्रसपाटीपासून २.०४९ फूट उंचीवर वसलेली ही गिरिस्थाने वीकएंडच्या सुट्टीसाठी अनेकांची पहिली पसंती ठरत आहे. या ठिकाणचा नेत्रसुखद निसर्ग व

सूर्यास्त जणू काही एखाद्या चित्रासारखा मनोहर भासतो. येथील प्राचीन लेणी व धबधबे एकूणच सौंदर्यात भर घालतात अलीकडे अनेक तरुण निसर्गप्रेमींकडून लोणावळा आणि खंडाळा परिसरात मोठ्या प्रमाणात कॅम्पिंगचे आयोजन केले जाते.

माथेरान

मुंबईपासून १०० किलोमीटर दूर व समुद्रसपाटीपासून २,६०० फूट उंचीवर माथेरान हे मोहक थंड हवेचे ठिकाण आहे. माथेरान या शब्दाचा शब्दशः अर्थ ‘माथ्यावरचे वन’ म्हणजेच पर्वतांवर स्थित जंगल असा होतो. धकाधकीच्या शहरी जीवनातून क्षणभर विश्रांतीसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यातील तीव्र झळांपासून मुक्ती मिळावी म्हणून
ब्रिटिशकाळात हे ठिकाण रिसॉर्ट म्हणून विकसित केले होते. माथेरान संपूर्ण आशिया खंडातील एकमेव वाहनमुक्त थंड हवेचे ठिकाण आहे. परिणामी शून्य प्रदूषणातील शांततापूर्ण नैसर्गिक वातावरण येथे अनुभवायला मिळते. माथेरानमध्ये वाहने नसल्याने येथे अनेक छोट्या नैसर्गिक लाल मातीच्या पाऊलवाटा आहेत. ज्यावरून भटकंती करत सभोवतालचा मोहक नजारा डोळ्यात साठवून घेऊ शकता.

जव्हार

पालघर जिल्ह्यात घनदाट जंगलामध्ये वसलेले हे पर्यटनस्थळ सुखद अनुभव देणारे आहे. वारली, कोलचा कुकणा अशा आदिवासी समुदायांचे हे घर आहे. येथील दैनंदिन जीवनाचे चित्रण करणारी वारली चित्रे अतिशय प्रसिद्ध आहेत. जव्हारमध्ये चित्रप्रदर्शन, कला केंद्रे, तारपा नृत्याचे
कार्यक्रम अधूनमधून सुरू असतात. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध, १३०६ साली

स्थापन झालेले जव्हार प्रथम मुनके साम्राज्याचे केंद्र होते, त्याची साक्ष देणारा जय विलास महाल आजही येथे पाहायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे सैन्य सुरतच्या वाटेवर असताना विश्रांतीस्थळ म्हणून याची निवड केली. जव्हारमध्ये व सभोवताली अलंग-कुलंग, काळदुर्ग, कोहेज, गुमतारा, टकमक, तांदुळवाडी, जलदुर्ग यांच्यासह तब्बल २९ गडकिल्ल्यांची ऐतिहासिक तटबंदी लाभली आहे. जव्हारच्या दक्षिणेस ८ कि.मी. अंतरावर काळमांडवी धबधबा आहे. ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि रॅपलिंग या साहसी खेळांसाठी हा खडकाळ आणि उंच धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. काळमांडवी धबधबा सुमारे १०० फूट उंचीचा असून वर्षभर वाहतो. याशिवाय हरिहरगड ग्रामदेवतेचे प्राचीन मंदिर, जयसागर व खडखड धरण, हनुमान पॉईंट ही येथील खास आकर्षणे आहेत.

तोरणमाळ

सातपुडा पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटी पासून ३,७७० फूट उंचीवर वसलेल्या तोरणमाळ गिरीस्थानावर निसर्गाचा वरदहस्त आहे. नाशिकपासून सुमारे ३०५ किमीवर असणारे तोरणमाळ हिरवळीने वेढलेले आहे. येथील तलाव पावसाळ्यात काठोकाठ भरतात त्यामुळे पावसाळ्यातील वीकेंड सहलींसाठी हे अगदी योग्य ठिकाण आहे. ऑक्टोबर ते में हा काळ येथे भेट देण्यास उत्तम मानला जातो. या भागात आढळणाऱ्या तोरणा वनस्पतीवरून या टेकडीचे नाव ‘तोरणमाळ’ असे पडले. येथेच टेकडीवर आदिवासींची देवी ‘तोरणा’ देवीचे मंदिर असून त्यावरूनच तोरणमाळ असे नाव पडल्याचेही मानले जाते. येथील वनस्पती व प्राण्यांच्या प्रजाती पाहण्यासाठी, पवित्र मंदिरामध्ये दर्शनासाठी व ट्रेकिंगसाठी पर्यटकांची गर्दी असते. सीताखाईनजीकच्या धबधब्यालगत उमललेली कमळे पाहणे खूप सुखद अनुभव असतो. यशवंत तलाव, मच्छिंद्रनाथ गुफा, गोरक्षनाथ मंदिर, लोटस तलाव, कॉफी
सातपुडागार्डन, आवसबरी पॉईंट, सनसेट पॉईंट, चेक डॅम हे येथील मुख्य पॉईंट्स आहेत. तोरणमाळावर गिर्यारोहण, कॅम्पिंग आणि कायाकिंगचे पर्याय उपलब्ध आहेत. ऊस उत्पादनासाठी तोरणमाळ प्रसिद्ध आहे. या सहलीत खानदेशी मसाल्यांनी बनवलेल्या पदार्थांची खास चव चाखायला मिळू शकते.

चिखलदरा

सर्वाधिक उष्णता अशी ओळख असणाऱ्या विदर्भातीत एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणजे चिखलदरा होय, समुद्रसपाटीपासून १९१८ मीटरवर वसलेले चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यात आहे. चिखतदन्याचा उल्लेख महाभारत महाकाव्यात आढळतो. पौराणिक कथेनुसार श्रीमाने कीचकाला ठार मारले आणि खोऱ्यात खाली फेकले. यामुळे या शहराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. तुम्ही चिखलदरा येथे पाऊल टाकताच हवेतील कॉफीचा गंध तुम्हाला भारावून टाकेल. या प्रदेशातील हे एकमेव कॉफी उत्पादक क्षेत्र आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर स्थित चिखलदरा विविध प्राणी आणि वनस्पतींच्या समृद्धीने वेढलेला आहे. चिखलदरा येथून हाकेच्या अंतरावर असणारा मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथे येणाऱ्या पर्यटकांना साहसी अविस्मरणीय अनुभव देऊन जातो. असे म्हणतात की, नशीबवानांना चिखलदरा घाटात रस्त्यावर सुद्धा वाघ दिसून येतात.

चिखलदरा येथील मुख्य आकर्षण म्हणजे देवी पॉईंट कारण येथूनच अन्य पर्यटन स्थळांना सुरुवात होते. भुयारातील देवी पॉईंटपासून चंद्रभागा नदीचा उगम होतो. देवीच्या मंदिरातील दगडी कुंडातून पडणाऱ्या पाण्याने येथे सुंदर धबधबा तयार
झाला आहे येथूनच जवळ पंचबोल किया इको पॉइंट आहे. जिये मोठयाने हाक मारल्यास पाच वेळा आवाज घुमतो. हा अनुभव घेण्यासाठी अनेक पर्यटक आवर्जून भेट देतात.

पन्हाळा

मराठ्यांच्या इतिहासाचा साक्षी पन्हाळा. महाराष्ट्रातील अत्यंत मनमोहक पर्यटन स्थळांपैकी एक आहे मुंबईपासून ३८० किमी अंतरावर व पुण्यापासून २३६ किमीवर पन्हाळा आहे. एमटीडीसी महालक्ष्मी आणि अन्य खासगी रिसॉर्ट्स यांनी येथे निवासाची उत्तम व्यवस्था केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे ५०० हून अधिक दिवस निवास केला होता. त्यामुळे मराठा साम्राज्यात या पन्हाळगडाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

पन्हाळगडावरील तबक उद्यान, वीर बाजीप्रभू यांचा पुतळा, अंबारखाना, धर्मकोठी, नायकिणीचा सज्जा, ताराराणी राजवाडा, सज्जाकोठी, वाघ दरवाजा, तीन दरवाजा, पांडवदरा, सोमेश्वर तलाव आदी प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. पन्हाळ्याचा माथा हिरवळीने बहरलेला असून येथील वातावरण आल्हाददायक असते. कोल्हापूरची गादी स्थापन करणाऱ्या महाराणी ताराराणी यांनी आपली राजधानी काही वर्ष येथे ठेवली होती. पन्हाळ्याला उत्तम कोल्हापुरी पदार्थ जसे की, तांबडा / पांढरा रस्सा, सुके मटण, मटण लोणचे, कोल्हापुरी मिसळ इत्यादीचा आस्वाद नक्की घेऊ शकता.

पाचगणी

पाचगणी पाच टेकड्यांनी वेढलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी वर्षभर आल्हादायक आणि शांत वातावरण
असते पाचगणी पुण्यापासून १२० किमी अंतरावर आणि मुंबईहून २५० अंतरावर आहे.
पाचगणी महाबळेश्वरच्या अगदी जवळ असल्याने जर का तुम्ही महाबळेश्वरची दोन दिवसांची सहल आखत असाल तर एक दिवस पाचगणीता नक्की जाऊ शकता. उत्कृष्ट हवामान आणि संपन्न, स्वच्छ नि हे पाचगणीचे वैशिष्ट्य आहे. खोत दया धबधबे, कमल गड, टेबल लँड, किस पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध व पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळे आहेत. येथील टेबल लँडवर अनेक चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. येथे १९व्या शतकात अनेक बोर्डिंग शाळांची स्थापना करण्यात आली होती. येथील पारशी लोकांनी प्राचीन काळात बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात..

पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण असूनही या ठिकाणी ज्वालामुखीच्या उद्रेकाने ज्वाला रस बाहेर येऊन हे डोंगर तयार झाले असावेत, असे मानले जाते.

इगतपुरी

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे राज्यातील लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण मुंबईपासून सुमारे १३० किलोमीटर अंतरावर स्थित आहे. खळखळणारे धबधबे. नितळ तलाव आणि समृद्ध जंगले यामुळे इगतपुरी आपल्याला निसर्गाच्या जगदी जवळ घेऊन जाते. जुने किले आणि निसर्गरम्य दृश्यांव्यतिरिक्त, रॉक क्लाइंबिंग आणि ट्रेकिंग अशा साहसी खेळांचा आपण येथे अनुभवू घेऊ शकता.

इगतपुरी येथे असणाऱ्या आंतरराष्ट्रीय
बिपश्यना केंद्रात शेकडो लोक
ध्यानसाधनेसाठी येत असतात शांततेत.

पर्यटन वाढीसाठी चालना…

महाराष्ट्र राज्यात कृषी, सांस्कृतिक आणि साहसी पर्यटनात प्रचंड क्षमता आहे

राज्यातील विविध पर्यटन धोरणाच्या माध्यमातून पर्यटन वाढीसाठी चालना देण्यात येत आहे. राज्यातीत ऐतिहासिक तसेच सर्व क्षेत्रातील पर्यटनाची माहिती राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध प्रसिद्धीचे उपक्रम राबवण्यात येत आहेत. समाज माध्यमांच्या बरोबर इतर माध्यमांचा उपयोग करून पर्यटन स्थळांची माहिती जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आत्मचिंतन किंवा खळाळत्या नदीत राफ्टिंग असे दोन टोकाचे अनुभव एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने प्रत्येक पर्यटकाची हेतुपूर्ती येथे होते हे निश्चित।

भीमाशंकर

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर हे धार्मिक महत्त्वासाठी व लगतच्या अभयारण्यातील वन्यजीवनासाठी जगविख्यात आहे. पुण्यापासून १०० किमी आणि मुंबईपासून २२३ किमी अंतरावर असलेले भीमाशंकर समुद्रसपाटीपासून ३.२०० फूट उंचावर सुंदर डोंगररांगांनी आणि घनदाट झाडीने वेढलेले आहे. त्यामुळे साहजिकच येथील वातावरण बाराही महिने आल्हाददायकच असते.

भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यावर तुम्ही पुढे भीमाशंकर ट्रेकचा अनुभव घेऊ शकता. येथून भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यातील वनस्पती आणि प्राणी जीवनाचा अभ्यास करण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येतो. डोंगरमाथ्यावरून देवी व हनुमान या दोन तलावांची निसर्गरम्य दृश्ये पाहायला मिळतील. येथून दिसणाऱ्या पश्चिम घाटाच्या नयनरम्य परिसराचे वर्णन
करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. शहरी धकाधकीपासून दूर स्थित भीमाशंकरची सहल म्हणजे निसर्गप्रेमी तसेच महादेवाच्या भक्तांसाठी पर्वणी आहे.

भंडारदरा

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले भंडारादरा हे मागील काही काळात कॅम्पिंग प्रकल्पामुळे लोकप्रिय झालेले ठिकाण आहे. भंडारदऱ्याला ‘सह्याद्रीची राणी’ असेही म्हणतात. मुंबईपासून १८५ किमी आणि अहमदनगरपासून १५५ किमीवर स्थित भंडारदरा हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाईहून हाकेच्या अंतरावर आहे. साहसी ट्रेकर्ससाठी भंडारदरा एक आव्हानच म्हणता येईल. हळुवार स्पर्शन जाणारी गुलाबी थंडी अनुभवताना समोर कणखर सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे दृश्य पाहता येणे हे निसर्गाचे चमत्कारिक समीकरण आपल्याला भंडारदरा सहलीत अनुभवता येईल

वाई

मंदिरांसाठी प्रसिद्ध सातारा जिल्ह्यातील वाई हे छोटेसे शहर आपल्या निसर्गसौंदर्यानि अनेक पर्यटकांना भुरळ घालते. कृष्णा नदीवर वसलेले हे पेशवे काळातील प्रमुख शहर होते. दक्षिण काशी या नावानेही ओळखले जाणाऱ्या वाईमध्ये श्रीशंकर व गौरीपुत्र विनायकाचे देवस्थान प्रसिद्ध असून त्याच्या दर्शनासाठी दर वर्षी अनेक भाविक गर्दी करतात. या ठिकाणी एक दोन नव्हे. तर तब्बल १०० हून अधिक मंदिरे आहेत.

साताऱ्यापासून ३५ किमी. अंतरावर बसलेले वाई हे वीकएंड सहलीसाठी उचित निवड ठरते, येथूनच पाचगणी किंवा महाबळेश्वरतासुद्धा तुम्ही जाऊ शकता. निसर्गप्रेम. इतिहासाप्रति कुतूहल, अभ्यासप्रेमी किंवा धार्मिक अशा कोणत्याही कारणाने तुम्ही वाईला भेट देऊ शकता आणि हे शहर तुम्हाला अजिबात निराश करणार नाही याची खात्री बाळगा. येथे असताना बोटिंग व पारंपरिक महाराष्ट्रीय भोजनाचा आस्वाद घेता येऊ शकतो.

माळशेज घाट

तलाव, धबधबे आणि दऱ्यांच्या मधोमध वसलेला माळशेज घाट, मुंबई पुण्यातील कामाच्या कचाट्यात अडकलेल्या जीवांना क्षणभर विश्रांती देणारी जादुई जागा आहे. पुण्यापासून १३० किमी, तर मुंबईपासून १५४ किमी अंतरावर स्थित माळशेज घाट परिसरात दुर्मीळ गुलाबी फ्लेमिंगो आढळतात. हिरवागार निसर्ग आणि सुंदर नैसर्गिक धबधबे यामुळे माळशेज घाट प्रत्येक निसर्गप्रेमींसाठी व मुख्यतः ट्रेकर्ससाठी पर्वणी ठरतो. प्राचीन किल्ले ते निसर्गरम्य ट्रेक सगळे काही एकाच ठिकाणी अनुभवायला देणाऱ्या या जागेला आम्ही जादुई का म्हटले हे आपल्याला येथे आल्यावरच कळू शकते.

गगनबावडा

कोल्हापूरपासून साधारण ५५ किमीवर स्थित गगनबावडा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पश्चिम घाटातील सर्वाधिक पाऊस पडणारे आणि परिणामी हिरव्यागर्द वनराईसाठीचे प्रसिद्ध ठिकाण आहे. याठिकाणी सिनेमाचे शूटिंगसुद्धा होत असल्यामुळे गगनबावडा अनेक पर्यटकांना आकर्षित करते. गगनबावडा येथून दर्शनीय कोकण किनारपट्टी व लगतचा हिरवागार करूळ घाट संपूर्ण महाराष्ट्रातील ट्रेकर्सना साद घालत असतो. डोंगरमाथ्यावर प्रसन्न निसर्गाचा आनंद घेत असताना श्रीगगनगिरी। महाराजांच्या मठालासुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. पावसाळ्यात या परिसरातील धबधब्यांमुळे हा परिसर अधिकच सुंदर दिसतो. उन्हाळा आणि हिवाळ्यात येथे भे देणाऱ्या पर्यटकांचीही संख्या मोठी आहे.

बी. एन. पाटील, पर्यटन संचालक
पर्यटन संचालनाल

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on