सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी आयोजित स्वररंग २०२३ या विद्यापीठ स्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव स्पर्धेत विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती या महाविद्यालयाला दोन वेगवेगळ्या कलाप्रकारात पारितोषिके
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, विद्यार्थी विकास मंडळ व अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ०७ आक्टोबर २०२३ रोजी विद्यापीठ स्तरीय आंतर महाविद्यालयीन स्वररंग २०२३ हा युवक महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती या महाविद्यालयाला
समूह लोकनृत्य:- प्रथम क्रमांक, वैयक्तीक लावणी नृत्य:- मानसी सुनिल भोसले, तृतीय क्रमांक
अशा दोन वेगवेगळ्या कलाप्रकारात पारितोषिके मिळाले. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रा. स. बिचकर विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. अनिल पाटील, सांस्कृतिक समन्वयक प्रा. पल्लवी बोके, नृत्य समन्वयक प्रा. निकिता शहा तसेच स्पर्धा समन्वयक प्रा. हनुमंत बोराटे यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, सचिव ॲड. निलीमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्थ डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्टार कर्नल श्रीश कंभोज तसेच सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले व त्याच्या पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Home Uncategorized कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती या महाविद्यालयाला दोन वेगवेगळ्या...