ऑल इंडिया लिनियस क्लबच्या वतीने रुग्णसेवा
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा
बारामती येथील ऑल इंडिया लिनियस क्लब च्या रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या अंतर्गत रुई ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना पौष्टिक आरोग्य वर्धक नाश्ता व रुग्णालयात लागणारे अत्यावश्यक साहित्य चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी लिनियस क्लबच्या अध्यक्षा उज्वला शिंदे, सचिव मनीषा खेडेकर सदर उपक्रम प्रमुख सुनंदा जगताप, राणी जगताप, लता भोसले व सदस्य सुनिता ढवण, सपना चांदगुडे, उलकाताई जाचक, विजया कदम आणि आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे सोमेश्वर कारखान्याचे माननीय उपाध्यक्ष प्रणिता खोमणे व रुई ग्रामीण रुग्णालय अधिक्षक यास्मिन पटेल व इतर मान्यवर उपस्थित होते.
लिनियस क्लब च्या वतीने रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून रुग्णांना व नातेवाईक यांना मदत करणे व डॉक्टर व नर्स यांच्या साह्याने आजार होऊ नये म्हणून जनजागृती करणे हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असल्याने लिनियस क्लबच्या वतीने सुनंदा जगताप यांनी सांगितले आभार विजया कदम यांनी मानले.
