उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले स्व. शांतीकुमार जंबुकुमार शहा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
बारामती, दि. १३ : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सराफा व्यापारी स्व. शांतीकुमार जंबुकुमार शहा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी शहा कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी पत्नी शोभाताई शहा, मुलगे रोहित शहा आणि शीतल शहा, मुलगी मिताली शहा उपस्थित होते.