आरक्षण खऱ्या अर्थाने गाजर आहे.ज्यांना आहे त्यांना लाभ मिळत नाही.ज्यांना नाही ते मिळविण्यासाठी आंदोलन करीत आहेत.माणुस म्हणुन जगण्याचा प्रगती करण्याचा संविधानाने अधिकार दिला तो हक्क आहे.या देशात किती तरी लोक असे आहेत की, ज्यांच्या पर्यंत संविधान पोहचलेच नाही हक्क काय आहे माहित नाही.आजहि राहायला डोक्यावर छतच काय,विसावा घ्यायला अंग टाकता येईल एवढी जमीन नाही. पोटाला अन्न नाही.कुपोषित आहेत नेता अभिनेता धनदांडग्याचे यांचे पाच पाचशे कोटीचे बंगले देश विदेशात आहे.हेच कोटीचे डल्ले देशाच्या तिजोरीवर मारुन उजळ माथ्याने फिरतात लोकप्रतिनिधी रक्षक नाही तर भक्षक आहेत.ब्रिटिश राजवटीतल्या नाना जाती गुन्हेगार म्हणून जगतात महिलावर बलात्कार होत आहेत.श्रध्देय राष्ट्रपतीने पाहीले.निरपराध तुरुंगात खितपत आहे .जल जमीन जंगल संपतीचे खरे मालक आदिवासी जंगल सुरक्षा कायद्याने त्यांना जंगलात देखील राहता येत नाही.ना मतदान, आधारकार्ड माणुस म्हणुन जगण्याच्या आधार नाही.येथे नाना धर्मांध ठेकदार आहे.परंतु मानवता धर्माचे ठेकेदार व्हायला कोणीच तयार नाही.देशात आरक्षण रक्षण,शिक्षण,मानवी जगण मानवता यांची कमालीची विषमता आहे.
आण्णा धगाटे लेखक साहित्यिक