“आपण खात असलेले अन्न जर दुष्ट – वाईट मार्गाने वागणार्या चे असेल तर आपली बुद्धी सुद्धा वाईट होते.”- प.पू.कृष्णनामदास
“आपण खात असलेले अन्न जर दुष्ट माणसाने किंवा चुकीच्या मार्गाने कामावलेले असेल तर त्याने आपली बुद्धी सुद्धा वाईट मार्गाने जाते. यासाठी चांगल्या लोकांची संगत धरावी”. असे प्रतिपादन प.पू कृष्णनामदास महाराज यांनी केले. महाभारतात शरपंजरी पडलेल्या पितामह भीष्म यांनी दुर्योधन अधर्मी दुष्ट आहे माहीत असूनही त्याचे अन्न खात असल्याने त्याच्या बाजूने गेलो असे श्री कृष्ण यांना संगितले. मात्र भागवत कथा प्रसाद अथवा कुठल्याही मंदिर-पुजा येथे मिळालेला प्रसाद ग्रहण केल्याने आपली शुद्धी होते असे पुढे संगितले. आंतरराष्ट्रीय श्री कृष्णभावनामृत संघ आयोजित भागवत सप्ताहात कथा सांगताना ते बोलत होते. गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी संयोजक हितेंद्र सोमाणी, सुरेश खांडेलवाल, नंदकुमार पापल, सीमा कोंडेस्कर आदी मान्यवरांच्या बरोबरच भाविक उपस्थित होते.