आज शनिवार दिं.२६ रोजी बारामतीत : गणेश शिंदे यांचे व्याख्यान : ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर संवाद….

0
58

बारामतीत : गणेश शिंदे यांचे व्याख्यान : ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर संवाद….

बारामती : येथील ‘एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया’च्या वतीने सुप्रसिद्ध विचारवंत आणि प्रेरणादायी व्याख्याते गणेश शिंदे यांचे विशेष व्याख्यान शनिवारी २६ रोजी येथे आयोजित करण्यात आले आहे. ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर ते बारामतीकरांशी थेट संवाद साधणार आहेत. ‘एन्व्हायर्नमेंटल

फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने हे व्याख्यान आयोजित करण्यात येत असून, समाजात नामवंतांच्या विचारांचा प्रसार व्हावा, हे यामागील मुख्य उद्दिष्ट आहे. बारामती येथील गदिमा सभागृहात सायंकाळी ६ वाजता हे व्याख्यान सुरू होईल.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वाढत्या मानसिक तणावामुळे अनेकांना आयुष्याचा खरा आनंद अनुभवता येत नाही. अशा परिस्थितीत जीवन कसे सुंदर करता येईल, आत्मप्रेरणेतून समृद्ध कसे होता येईल, याबाबत शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची संधी मिळणार आहे.

हे व्याख्यान सर्व नागरिकांसाठी विनामूल्य असून, सर्वांनी उपस्थित राहून या जीवनमूल्यांच्या संवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामती यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here