नका होऊ कार्यकर्ता ! जाणा
कुटुंबाचा पोशिंदा कर्ता …..
कार्यकर्त्यांनो, माणुस म्हणुन व्हा सावधान!
जागे होऊन ,वाचवा माणसाच्या न्याय हक्काचं संविधान !
भोळ्या भाबड्याना जबरदस्तीने नका करायला लावु मतदान !!
निवडणुक काळात नेता नेईल तुम्हाला धाब्यावर !
निवडणुक झाल्यावर बसविल धाब्यावर!
खैरात तुमच्यावर उधळायची सोडुन उधळीन आपल्या बाब्यावर!
नेता आता तुम्हाला देईल चपटी नायन्टी!
तुम्ही काम घेऊन गेल्यावर वाजविल नकारघंटी
तुमच्यासाठी कार्य करीलच याची नसते ग्यारंटी
नेत्याला तुम्ही आदराने म्हणता भाऊ दादा!
पण हाच नेता धावुन येत नाही तुमच्यावर येता आपदा!
गोड बोलुन चुना लावणे हा एकच असतो वादा!!
रसातळाला नेते हि राजकारणाची नशा !
वरुन लोकशाहीचे किर्तन असले तरी आत भ्रष्ट तमाशा !
अशा राजकारणा पायी का, जवळ करता आपल्या विनाशा!!
नेत्याच नका करु लांगुलचालन!
ओळखुन घ्या त्याच भ्रष्ट चालचलन!
कार्यकर्ता राबतो,नेता कमावतो कोट्यावधीचे असते त्याचे चलन !!
नका बळी पडु नेत्याच्या भुल थापाला!
नका साथ देऊ नेत्याच्या भ्रष्ट पापाला!
नेत्या परीस श्रेष्ठ अशा ओळखा आपल्या बापाला!!
नेत्यांसाठी नका करु मतदान झुंडशाहीत!!
जाणुन घ्या लोकांसाठी लोकांची खरी सत्ता आहे लोकशाहीत!
लोकशाही जगवा नका मारु तिला ठोकशाहीत!!
नेता जुमानत नसतो आपल्या गणगोताला!
तो केवळ अन् केवळ ओळखत असतो स्वत:ला!
नेता चटावलेला आहे सत्तापिपासु रक्ताला!!
आज देशात राजकारणी आहेत खरे बेईमान!
त्यांच्यासाठी तुम्ही का धुळीत मिळवता तुमचे इमान!
निवडणुकीच्या काळात मुतण्या पुरता ठेवतील मानसन्मान!!
गावा गावात तुम्ही लढता हा माझा तो त्याचा पक्ष!
पक्षाचे नेते तुम्हाला लढवतात,एक होऊन देश लुटणे हे एकच त्यांचे लक्ष्य!
देश लुटत असताना भांडता का होता या गिधाडाचे भक्ष्य!!
तुम्ही राबला नाही तरच नेत्याला कळेल त्याची लायकी!
कळेल याच कार्यकर्त्याच जिवावर भोगतो आमदारकी, खासदारकी!
कळु द्या,बेधुंद भ्रष्टाचाऱ्याला माणसाला माणुस बनवत असते माणुसकी !!
नेत्यांकडे पाहण्यापेक्षा पहा सुशिक्षित तरुणाईकड!
कष्टाने तुम्हाला जगवते पहा त्या बाप अन् माईकड!
गाळुन घाम मिळत नाही दाम पहा घामानं भिजलेल्या काळ्या आईकड!!
या नेत्यांनी काळी आई उध्वस्त करुन उभे केले इमले!
कष्टकरी पिडीत आदीवासीची बरबाद केली जंगले!
दारिद्र्यात जगणाऱ्या बापाला यांनीच फासावर लटकवले!!
कार्यकर्ता बनुन नका घेऊ डोक्यावर नेत्याच पाप!
एमपीएससी युपीएससी शिकुन व्हा यांचे प्रशासनातले बाप!
साहेब झाल्यावर डोळ्यातले अश्रु पाहून कळले तुम्हाला बाप हाच असतो बाप !!
आण्णा धगाटे :–
जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता