अभिनव कला महाविद्यालयाचे ग्रंथपाल कांतीलाल ठाणगे सेवा निवृत्त.

0
45

     छायाचित्र : कांतीलाल ठाणगे यांना मानपत्र देतांना मान्यवर       

पुणे (दि.३१) अभिनव कला महाविद्यालयाचे ग्रंथपाल कांतीलाल ठाणगे सेवानिवृत्त झाले.त्यांनी ३७ वर्ष कार्य केले. यांचा निरोप व मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. हा समारंभ हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे संपन्न झाला.

या कार्यक्रम प्रसंगी भारतीय कला प्रसारिणी सभा न्यासाचे सचिव पुष्कराज भालचंद्र पाठक, अभिनव कला महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल बळवंत, अभिनव कला महाविद्यालय पाषाणचे प्राचार्य डॉ.संजय भारती, उषा ठाणगे(पत्नी) याबरोबरच नातेवाईक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. या प्रसंगी बोलतांना पुष्कराज पाठक यांनी कांतीलाल ठाणगे यांनी ग्रंथपाल म्हणून नुसती नोकरी केली नाही तर या कार्याला वाहून घेतले.

असे प्रतिपादन केले.प्राचार्य राहुल बळवंत यांनी बोलतांना ३७ वर्ष विद्यार्थ्यांना उत्तम ग्रंथसेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. अनेक सहकार्यांनी त्यांच्या कामाबद्दल विविध आठवणी सांगितल्या. सत्काराला उत्तर देतांना कांतीलाल ठाणगे यांनी सर्वांचे आभार मानले व जेव्हा संस्थेला आपल्या कार्याची आवश्यकता भासेल तेव्हा आपण तत्पर कार्य करू असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here