अंजनगाव येथील नेचर क्लबचे वतीने प्रत्येक रविवार या दिवशी “ एक दिवस गावासाठी” या उपक्रमाच्या माध्यमातुन ऑक्टोबर- २०२५ वर्षापासुन गावात परिसराची स्वच्छता करण्यासाठी ‘स्वच्छ परिसर अभियान’ आणि “ वृक्षारोपण व संवर्धन” …

0
8

अंजनगाव येथील नेचर क्लबचे वतीने प्रत्येक रविवार या दिवशी “ एक दिवस गावासाठी” या उपक्रमाच्या माध्यमातुन ऑक्टोबर- २०२५ वर्षापासुन गावात परिसराची स्वच्छता करण्यासाठी ‘स्वच्छ परिसर अभियान’ आणि “ वृक्षारोपण व संवर्धन” …

तालुका बारामतीतील अंजनगाव येथील नेचर क्लबचे वतीने प्रत्येक रविवार या दिवशी “ एक दिवस गावासाठी” या उपक्रमाच्या माध्यमातुन ऑक्टोबर- २०२५ वर्षापासुन गावात परिसराची स्वच्छता करण्यासाठी ‘स्वच्छ परिसर अभियान’ आणि “ वृक्षारोपण व संवर्धन” कार्यक्रम राबवित आहे. याच बरोबर आता पावसाचे कमी प्रमाण व दुष्काळग्रस्त परिस्थिती याचा विचार करता “ पाणी वाचवा अभियान “ राबवित आहे. नेचर क्लब चे सदस्यांनी यावेळी वृक्षारोपन केलेल्या झाडांना टँकर द्वारे पाणी दिले तसेच झाड्यांच्या अतिरिक्त फाद्या कटींग करून सावळुन झाडांचे संवर्धन केले. पाण्याचे टँकरचे सहकार्य क्लबचे सदस्य जगदिश परकाळे यांनी केले. अनिल वायसे यांनी झांडाना पाणी देणेसाठी प्रत्येक महिन्याला एक टँकर देणेचे कबुल केले. वृक्षारोपन केलेल्या झाडांचे संपुर्ण संवर्धन करण्याचे क्लबचे सदस्यांनी शपथ घेतली.
यापुढे क्लबचे माध्यमातुन पाणी वाचवा अभियान राबविणेत येणार आहे. गावातील नागरिकांना पाण्याचे बचती बाबत व पाण्याचे महत्त्व पटवुन देऊन प्रत्येक नागरिकाची ही नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे असे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here