जागतिक क्षयरोग दिन
मार्च २४
क्षयरोग हा अनंत काळापासून मानव जातीस लागलेला भयंकर रोग आहे. क्षय या शब्दाचा अर्थ झीज. निरोगी माणूस हा रोग झाल्यावर कणा कणाने झिजून नष्ट होत असे म्हणून या रोगास राजयक्ष्मा किंवा क्षय असे नाव दिले गेले आहे.
जगात दरवर्षी क्षयरोगामुळे एकूण ३० लाख रोगी मृत्यूमुखी पडतात. त्यापैकी ५ लाख मृत्यू दरवर्षी भारतात पडून येत आहेत. म्हणजेच दररोज सुमारे १००० पेक्षा जास्त व दर मिनिटाला एक मृत्यू क्षयरोगामुळे घडत आहे. जगातील एकूण क्षयरुग्णांपैकी एक तृतीयांश क्षयरुग्ण एकट्या भारतात आहेत. इतर कोणत्याही संसर्गिक आजारामुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षा क्षयरोगाने होणारे मृत्यूचे प्रमाण स्त्रिया व बालकांमध्ये जास्त आहे. क्षयरोग हा ‘मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस’ या जंतूमुळे होतो.
क्षयरोग हा क्षयजंतूपासून होणारा सांसर्गिक रोग आहे. एका क्षयरोग्यापासून दुसऱ्यास क्षयरोग होतो. मुख्यतः हा रोग क्षयरोगाच्या थुंकीच्या फवाऱ्यात सापडलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या फुफ्फुसात क्षयजंतू गेल्यामुळे पसरतो. क्षयरोग्याच्या खोकण्या- थुंकण्यामुळे जमिनीवर धुळीत क्षयजंतू मिसळतात व वाऱ्याबरोबर इतरत्र वाहत जाऊन माणसाच्या शरीरात जाऊ शकतात. ज्या व्यक्तींची मुळातच प्रतिकार क्षमता कमी असते अथवा मधुमेह, ताणतणाव, एड्सची बाधा, कुपोषण यासारख्या गोष्टींमुळे प्रतिकारशक्ती क्षीण झालेली असते. त्यांच्यामध्ये क्षयरोग वाढून फुफ्फुसामध्ये दाह निर्माण होतो व फुफ्फुसांना इजा होते. अथवा काही रोग्यात हे जंतू रक्तावाटे, लिम्फ व स्वावावाटे शरीरात इतरत्र पसरतात. त्यामुळे मेंदूचा क्षय, लिम्फागाठींचा क्षय, आतड्याचा क्षय, हाडांचा क्षय किडनी अथवा जननेंद्रियांचा क्षय होऊ शकतो. म्हणजेच क्षयरोग शरीराच्या कुठल्याही भागाला होऊ शकतो. औषधाला दाद न देणारा खोकला व दोन आठवड्यापेक्षा अधिक टिकणारा खोकला, छातीत दुखणे, श्वा
लागणे, खोकल्यातून रक्त पडणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे आणि रोज संध्याकाळी अंग गरम हो
चिडचिडेपणा वाढणे इत्यादी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. क्षयाचे निदान रोगा
लक्षणावरून, एक्स-रे वरून व प्रयोगशाळेत थुंकी तपासणी करून करतात. यावर अलिकडे वर्ल्ड है
ऑर्गनायझेशनने थोड्या कालावधीत म्हणजे ४-६ महिन्याकरताची औषध उपाययोजना ठरविली आहे.
योजनेत आयसोनियाझाईड, स्ट्रेप्टोमायसिन, रिफाम्पिसिन, इथमब्युटल व पायरेझिनामाईड या औषधांचा सम
होतो. दुय्यम स्वरुपाची काही नवीन औषधेही बाजारात उपलब्ध आहेत. मात्र अकाली वा मध्येच औषधोपचार बंद केला किंवा अनियमित औषधोपचार घेतला तर आजार वा नियमित औषधांनी क्षयरोग हमखास बरा होऊ शकतो. खोकताना तोंडावर रुमाल धरावा. वाटेल तेथे थुंक क्षयरोगाची थुंकी जाळून वा पुरून टाकावी. लहान बाळाला जन्मानंतर बी.सी.जी. लस टोचून घ्यावी. क्षयर औषधे सर्व शासकीय, महानगरपालिका, नगरपालिका दवाखान्यात मोफत मिळतात. रॉबर्ट कॉक या शा इ.स. १८८२ मध्ये क्षयरोगाचे जंतू शोधून काढले तो २४ मार्चचा दिवस ‘जागतिक क्षयरोग दिन’ म्हणून केला जातो. क्षयरोग नियंत्रणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा होय.