Homeसंपादकीयहोळकरांच्या "हॉटेल राम' ची चव'च' न्यारी …!

होळकरांच्या “हॉटेल राम’ ची चव’च’ न्यारी …!

होळकरांच्या “हॉटेल राम’ ची चवच न्यारी …!

“हॉटेल राम’ बारामती नीरा रोडला लागून होळ जवळ असलेल्या… निसर्गरम्य वातावरणाने टवटवीत , मन कसे प्रफुल्लित करून सोडेल अशा ठिकाणी हे “हॉटेल राम ” स्वच्छ, सुंदर ,स्वादिष्ट , अधिक रुचकर, चटकदार जिभेची चव पुरवणारे पदार्थ तर जेवणासाठी नाष्टा चहा अवश्य घ्यावा असे प्रशस्तप्रीय हॉटेल राम….होय…!

येथील स्वच्छता सर्व काही एखाद्या हवेच्या मोठ्यात मोठ्या हॉटेललाही लाजवेल असे काही स्टीलचे खुर्च्या, बाकडे, स्वच्छ प्रतीचे ग्लास, हॉटेल डिझाईन साहित्याचा वापर झालेला येथे आल्यावर आपल्याला पाहायला मिळेल प्रशस्त पार्किंग व्यवस्था, टॉयलेट, बाथरूमची सोय वॉश बेसिंग.

एकच व्यक्ती अनेक उद्योग त्यातच विविध वस्तूंची विक्री तेही या हॉटेल व्यवसायाशी निगडित चहा नाश्ता मिसळ सर्व काही शाकाहारी स्वादिष्ट पूर्ण जेवणात थाळी स्पेशल जेवणाचे ताट दोन भाजी, वरण, उत्तम क्वालिटी तांदळाचा भात,तर सर्वोत्तम धान्याच्या ज्वारीच्या / बाजरीच्या पिठाची भाकरी ज्वारी – बाजरी भाकरी, चपाती, पापड,लोणचे, ठेचा मिरचीचा, सोबत कांदा मग काय जिभेला वेगळीच चव सांगायला नको… सोबत.. हा.. दही वाटी मग काय तो.. मनमुराद जेवणाचा स्वाद तोही आपल्या मनातील जेवणाची , चहा नाश्ता इच्छा पूर्ती करणारं निरा बारामती रोडला लागून असलेल् होळ जवळील “हॉटेल राम” मध्ये आवश्यक मिळेल…होय. !

या “हॉटेल राम ” ची स्थापना साधारण एक वर्षापूर्वी झाली सर्वसाधारण कुटुंबातील होळकर दांपत्याने या हॉटेल रामची निर्मिती केली. असं काही मोठे उद्दिष्टे सुरुवातीला नव्हते मात्र वेळोवेळी बदल ग्राहकाची मनपसंत सोबत कष्ट जिद्द चिकाटी मेहनत करून वेळेत कसे ग्राहकांना जेवण, नाश्ता, चहा तोही कायम चवीचे पदार्थ सौ. मनीषा सतीश होळकर सुरुवातीला गृहणी आता हॉटेल स्वतः सांभाळतात येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांना सर्वोत्तम आपली सेवा देऊन आपल्या राम हॉटेलचे जेवण नाश्ता चहा आपुलकीने एकाग्रता मग्न होऊन हॉटेल राम कसे बाहरत आहे याची प्रचिती येथे आल्यावर नक्कीच पाहायला मिळते.

माझी काही त्यांच्यासोबत ओळख नव्हती मात्र मी व आमची सौभाग्यवती दोन-तीन वेळेला चहा नाश्ता तर जेवण ही दोन वेळा केले. म्हणून मुद्दाम या “हॉटेल राम” साठी लेखन करण्याची संकल्पना सुचली.

व काही फोटो घेतले तर “हॉटेल राम “चा लेख लिहितो म्हटल्यावर सौ. होळकर म्हणाल्या की आम्ही प्रसिद्धी वगैरे नाही करत. यासाठी आमच्या मिस्टरांना विचारा मगच टाका. असे सांगण्यात आले.

त्यावर सौ. होळकरांचे मिस्टर सतीश होळकर यांना फोन केल्यावर त्यांना वरील घटनाक्रम सांगितल्यावर त्यांनी म्हटले, सर मी पूर्वी कॉलेज जीवनात हॉटेल मेस मध्ये जेवण घ्यायचं. तेथे पोटाचे विकार व्हायचे, हे सर्व माहिती असल्यामुळे एक संकल्पना सुचली,’ व या संकल्पनेने चांगल्या प्रतीचे सर्वोत्तम जेवण, नाश्ता, चहा सोबत स्वच्छता, निरोगीपणासाठी चांगल्या प्रतीचे खाद्य तेल, ज्वारी/ बाजरी लागणारे सर्व हॉटेलचे साहित्य हे निवडक तर चांगल्यात चांगल्या कॉलिटी चे सर्वोत्तम प्रतीचे,पौष्टिक असते.

आपण स्वतः किचनमध्ये जाऊन खात्री करा. मी बारामतीला आहे. मी प्रसिद्धी वगैरेच्या, भानगडीत पडत नाही. आपले काय चार्जेस कमीत कमी प्रमाणात करा.

असे म्हटल्यावर मी त्यांना हेही सांगितले की मला येतील “हॉटेल रामचे” व्यवस्थापन सोबत परिसर स्वादिष्ट असे जेवण मिळाले सोबत माझी सौ. खुश झाल्या म्हणून आपल्या “हॉटेल रामचा” लेख भावनगरीच्या माध्यमातून प्रकाशित करत आहे. त्यावर त्यांनी माझे खूप खूप आभार व्यक्त केले. हीच ती अनुभव हीच खात्री तर आपणही बारामती निरा रोडला लागून असलेले होळ जवळील “हॉटेल राम ” ला आवश्यक भेट देऊन नाश्ता, जेवणाचा मनमुराद आनंद घ्यावा… बस…!

शब्दांकन संतोष शिंदे भावनगरी संपादक बारामती ९८२२७३०१०८

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on