हॉटेल सिटीन चौकात सांडलेल्या ऑइलमुळे अपघात; नगरपरिषदेची तत्काळ उपाययोजना…!

0
3

हॉटेल सिटीन चौकात सांडलेल्या ऑइलमुळे अपघात; नगरपरिषदेची तत्काळ उपाययोजना…!

आज सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना हॉटेल सिटीन चौक परिसरात सुमारे ४०० फूट अंतरावर रस्त्यावर सांडलेले ऑइल आढळून आले. काही अंतरावर पुढे गेल्यावर याच ठिकाणी दोन अपघात झाल्याचे निदर्शनास आले. रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता लक्षात घेता जागरूक नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला याची माहिती दिली.
जागरूक नागरिक अनिल सातव, किरण शहा, सतीश पांडकर व मुकुंद बडवे यांनी ही बाब नगरपालिका नगरसेवक श्री. सोनवणे यांच्या निदर्शनास आणून दिली. माहिती मिळताच श्री. सोनवणे यांनी अत्यंत तत्परतेने कार्यवाही करत संबंधित ठिकाणी त्वरित माती टाकण्याचे आदेश दिले.


नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत रस्त्यावर सांडलेल्या ऑइलवर माती टाकून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ अपघात टळले
सांडलेल्या ऑइलमुळे होणारे संभाव्य धोके लक्षात घेता तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे होते. नगरपरिषद व प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, या जलद कार्यवाहीबद्दल नगरपरिषद व प्रशासनाचे नागरिकांकडून आभार मानले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here