स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रशासकीय भवनात दिमाखात ध्वजारोहण

0
9

स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रशासकीय भवनात दिमाखात ध्वजारोहण

उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते ध्वजारोहण; राष्ट्रगीताने भारावले वातावरण

बारामती, दि. १५ : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बारामती येथील प्रशासकीय भवनात उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते दिमाखात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी देशभक्तीपूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळाला.
ध्वजारोहणानंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व राज्यगीताचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. यावेळी त्यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय, नगरसेवक, पत्रकार व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष सचिन सातव, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, तहसीलदार स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी किशोर माने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, तालुका कृषी अधिकारी सचिन हाके, उपअधीक्षक भूमीअभिलेख संजय घोंगडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय, नगरसेवक, पत्रकार तसेच नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे प्रशासकीय भवन परिसरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साहात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here