HomeUncategorizedबारामती नगरपरिषद स्वच्छ भारत अभियान 2.0 माझी वसुंधरा अभियान 4.0स्वच्छ सुंदर...

बारामती नगरपरिषद स्वच्छ भारत अभियान 2.0 माझी वसुंधरा अभियान 4.0स्वच्छ सुंदर हरित बारामती सहभाग सर्वांचा अभिमान सर्वांचा…

निर्मल वारी….हरित वारी
यंदाच्या वारीत करु वृक्षारोपण सामजिक जबाबदारीच भान राखून करू निसर्गाचं आणि पर्यावरणाचं संवर्धन..

वृक्ष लावा अंगणात पसरेल समृद्धी जीवनात.

संकल्प नव्हे कृती करूया पर्यावरणासाठी कटिबध्द होऊया..
वृक्षसंपदा जपणं आणि वाढवणं म्हणजे आपलं आणि आपल्या पुढच्या पिढीला एक शाश्वत नैसर्गिक संपत्ती प्रधान करण्यासारखं आहे.वातावरण बदल हा शब्द जवळपास अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतो.या वातावरण बदलाचे मुख्य कारण वृक्षतोड,प्रदुषण हे आहे.निसर्गावर होत असलेले माणसाचे अतिक्रमण त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे.त्याचे दुष्परिणाम म्हणजे वेळेवर पाऊस न पडणे,अवकाळी पाऊस पडणे यामुळे अनेक अहितकारी गोष्टी घडताना आपण पाहत आहोत.
वसुंधरे वरील म्हणजेच पृथ्वीवरील वने, माती, हवा, पाणी व जैवविविधता यांसह सर्व नैसर्गिक संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करणे, तसेच पुढील पिढ्यांसाठी त्यांचे संवर्धन करणे, मानवनिर्मित कृतीमुळे पृथ्वीवर होणारे प्रदूषण व पर्यावरणाची नासाडी रोखणे किंवा त्याला आळा घालणे ह्या साठी एकच पर्याय आपल्या हातात आहे तो म्हणजे वृक्षारोपण..या भारत भूमीत अनेक क्रांत्या झाल्या. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ‘सशस्त्र क्रांती’ झाली. दूधगंगा घरोघरी पोहोचविण्यासाठी ‘धवल क्रांती ‘ झाली. आज आपल्या पूढे स्वप्न आहे सर्वत्र वृक्षारोपण करून ‘हरित क्रांती ‘ निर्माण करण्याची..!
सुजलाम् सुफलाम् मलयज_शीतलाम् शस्यश्यामलाम्” अशी होती धरती माझी. वैविध्याने नटलेली पाचूच्या बेटांसारखी पण आज ही धरती उजाड दिसत आहे. हिरवेगार डोंगर सुने-सुने वाटू लागले आहे. उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झालेला आहे. जंगल क्षेत्रातील मोठमोठे भाग आपण आधीच तोडून साफ केले आहेत त्यातील लाकूड इमारत बांधण्यासाठी, लाकडी वस्तू करण्यासाठी, इंधनासाठी, कागद निर्मितीसाठी वापरले.

निसर्गाच्या बाबतीत आपण सर्वच मानव स्वार्थी आहोत ” देतो तो निसर्ग, घेतो तो मानव ” निसर्गालाच लुटणारा स्वार्थी मानव आणि पृथ्वीवर वाढत जाणारी लोकसंख्या, प्रदुषण आणि औद्योगिकरण या सर्वाचा धोका निसर्गाला बसला आहे. औद्योगिकरण व वाहतूक समस्यांमुळे प्रदुषण वाढले.त्यामुळे वृक्षारोपण करणे काळाची गरज बनली आहे. पर्यावरण संतुलन राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

          *“वृक्ष वल्ली आम्हा सोयरे  वनचरे” असे तुकाराम महाराज म्हणतात.* या भारत मातेचे सजल हिरवे रूप पहायचे असेल तर प्रत्येकाने आपला वाटा उचलला पाहिजे. झाडे लावणे, वृक्षांचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. 

वारी काळात आपण बारामतीकर प्रण करूयात आपल्या घरासमोर सोसायटी समोर परिसरात प्रत्येकानी किमान एक झाड लावूयात व त्याचा सेल्फी नगरपालिकेशी शेअर करूयात
ज्यास्त वृक्षारोपण करून त्याचबरोबर संवर्धन करेल त्यांचा वृक्षमित्र अथवा हरितमित्र म्हणून बारामती नगरपालिकेमार्फत गौरव करण्यात येणार आहे

स्वच्छ सुंदर हरित बारामती
सहभाग सर्वांचा
अभिमान सर्वांचा

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on