श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर “व्हा.चेअरमन पदी”. श्री.बाळासाहेब ज्ञानदेव कामथे रा.खळद, ता.पुरंदर यांची निवड जाहीर.
राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार सॊ।यांचे सूचनेनुसार आज शुक्रवार दि.२/०२/२०२४ रोजी श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखानाचे “व्हाईस चेअरमनपदी श्री.बाळासाहेब ज्ञानदेव कामथे रा.खळद, ता.पुरंदर यांचे नांव बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री संभाजीनाना होळकर यांनी जाहीर केले.यावेळी कारखान्याचे चेअरमन श्री.पुरुषोत्तमदादा जगताप, मावळते व्हाईस चेअरमन सौ.प्रणिताताई खोमणे, कार्यकारी संचालक श्री.राजेंद्र यादव, माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्री.राजवर्धनदादा शिंदे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.