“सुरक्षित बारामती” अभियानात सामील व्हा…!

0
135

सुरक्षित बारामती’ अभियानात सामील व्हा…!

स्वच्छ सर्वेक्षण 2023 माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत नगरपरिषद बारामती द्वारा “सुरक्षित बारामती” अभियान हे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करण्यात आली आहे.


“सुरक्षित बारामती” अभियान उद्घाटन समारंभ स्वच्छ सर्वेक्षण हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आला या “सुरक्षित बारामती” अभियान कार्यक्रमांमध्ये सॅनिटरी पॅडचा कचरा कागदाने गुंडाळून व लाल ठिपक्यांची चिन्हांकित करून घंटागाडीला द्यावा असे नागरिकांना आवाहन करण्यात आले. जर आपण सॅनिटरी पॅडचा कचरा वर्गीकृत दिला नाही. तर कचरा वेचकांना व सफाई कर्मचाऱ्याना स्टेफीलोकोकस, हिपॅटा यटिस, इ कोलाय, साल्मोनेला आणि टायफाईड यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते, तसेच मिक्स कचऱ्यावर प्रक्रिया होणे शक्य नाही. व नागरिकांनी जर का? सॅनिटरी पॅड चा कचरा हा मिक्स किंवा इतर ठिकाणी टाकला तर सॅनिटरी पॅड हे 800 वर्ष सडत नाही कुजत नाही म्हणून नागरिकांनी सॅनिटरी पॅड चा कचरा हा घंटागाडी ला वर्गीकृत द्यावा व “सुरक्षित बारामती” या अभियानात सामील व्हावे, अशाप्रकारे माहिती देण्यात आली.
त्यानंतर “सुरक्षित बारामती” अभियानचे मान्यवरांच्या हस्ते ब्रॅण्डिंग चे अनावरण करून व घंटागाडीला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन समारंभ संप्पण झाला.
कार्यक्रमा मध्ये सॅनिटरी कचरा संकलन,वर्गीकरण आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याविषयी आरती पवार मॅडम यांनी विचार विचारवेक्त केले.
कार्यक्रमास मुख्याधिकारी श्री.महेश रोकडे, कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ डॉ.विवेक भोईटे, आरोग्य विभाग प्रमुख आदित्य बनकर,आरती पवार, अडसूळ मॅडम, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, स्वच्छता निरीक्षक अजय लालबिगे, कुणाल लालबिगे ,अक्षय नाईक, सोशल लॅब इन्व्हरमेंटल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड चे प्रतिनिधी ,भगिनी मंडळ, महिला बचत गट, राष्ट्रवादी महिला, शाळा व महाविद्यालयतील शिक्षक- शिक्षिका यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात एकूण 59 उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here